Imtiyaz Jaleel Saam TV
महाराष्ट्र

Aurangabad: काम मंजूरीसाठी झेडपीच्या बांधकाम सभापतींनी मला मागितले ५ टक्के : खासदार इम्तियाज जलील

ही मागणी फक्त मलाच नाही तर जिल्ह्यातील अनेक सरपंचांना केली असल्याचा दावा खासदार जलील यांनी केला आहे.

साम न्यूज नेटवर्क

- अविनाश कानडजे

औरंगाबाद : औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (imtiaz jaleel) यांनी जिल्हा परिषद (aurangabad zilla parishad) बांधकाम सभापती किशोर बलांडे (kishore balande) यांच्या विरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांच्याकडे लाच खाेरीची तक्रार केली आहे. ५० लाख रुपयांचे काम मंजूर करण्यासाठी बलांडे हे पाच टक्के दलाली मागत असल्याचा आराेप खासदार जलील यांनी केला आहे. (Imtiyaz Jaleel latest marathi news)

एका जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापतींनी खुद्द खासदारांनाच पाच टक्के दलाली मागितल्याने जिल्ह्याभरात एकच खळबळ उडाली आहे. ही मागणी फक्त मलाच नाही तर जिल्ह्यातील अनेक सरपंचांना केली असल्याचा दावा खासदार जलील यांनी केला आहे.

आगामी काळात हा संपूर्ण घोटाळा बाहेर काढणार असून त्यासाठी उच्च न्यायालायत देखील जाऊ असा इशारा खासदार जलील यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आमच्या तक्रारीची दखल घेत नक्कीच चौकशी लावतील असा विश्वास खासदार जलील यांनी व्यक्त केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaishno Devi Temple : वैष्णो देवीचे दागिने चोरी; आमणापूरच्या मंदिरात चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

kumbha And Tula Rashi : करिअरपासून ते बिजनेसपर्यंत कसा जाणार कुंभ आणि तूळ राशीचा आजचा दिवस?

JioPC भारतात लाँच, आता कोणताही टीव्ही बनणार तुमचा कम्प्यूटर, कमी किमतीत भन्नाट सुविधा

Palghar Shocking : काकूनेच रचला पुतण्याच्या हत्येचा कट, १ लाखांची सुपारी दिली, एक चूक केली अन् भंडाफोड झाला

Maharashtra Live News Update: पुणे -सातारा महामार्गावर कंटेनरने ५ वाहनांना दिली धडक, ५ जण जखमी

SCROLL FOR NEXT