IND-W VS NZW: न्यूझीलंडविरुद्ध ऋचा घोषची दमदार कामगिरी पाण्यात; ६३ धावांनी टीम इंडिया हरली

पावसामुळे सध्या सुरू असलेला चौथा एकदिवसीय सामना २० षटकांसाठी कमी करण्यात आला आहे.
Richa Ghosh
Richa GhoshSaam Tv
Published On

क्वीन्सटाउन : भारतीय फलंदाज ऋचा घोषने (richa ghosh) आज (मंगळवार) महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये (भारतीय फलंदाजांमध्ये) सर्वात जलदगतीने अर्धशतक नोंदवले. क्वीन्सटाऊन येथील जॉन डेव्हिस ओव्हल येथे न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) सुरू असलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात रिचाने ही कामगिरी केली. (Richa Ghosh recorded the fastest fifty by an Indian batter in women's ODI cricket)

घोषने अवघ्या २६ चेंडूत चार चाैकार आणि चार षटकार ठाेकत अर्धशतक पूर्ण केले. ५२ धावांवर ती बाद झाली. पावसामुळे (rain) सध्या सुरू असलेला चौथा एकदिवसीय सामना २० षटकांसाठी कमी करण्यात आला आहे.

Richa Ghosh
AFC Asian Cup 2023: भारतास मिळाला आशियाई फुटबाॅल करंडक अंतिम पात्रता फेरीच्या आयाेजनाचा मान

तत्पूर्वी, अमेलिया केरने ३३ चेंडूंत ११ चौकार आणि एक षटकार ठाेकत ६८ धावांची खेळी केली. न्यूझीलंडने भारताविरुद्ध (india) पाच गडी बाद १९१ धावांची मजल मारली. सुझी बेट्स आणि सोफी डिव्हाईन यांनी ४१ आणि ३२ धावा केल्या. एमी सॅटरथवेटने १६ चेंडूंत ३२ धावांची खेळी केली. भारताकडून रेणुका सिंगने दोन गडी बाद केले.

दरम्यान न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या वनडेत भारताचा ६३ धावांनी पराभव झाला. यामुळे रिचा घोषचे अर्धशतक अर्धशतक व्यर्थ गेले. भारताचा डाव १७.५ षटकात १२८ धावांत गुडाळला गेला.

Edited By : Siddharth Latkar

Richa Ghosh
Russia-Ukraine Conflict: रशिया -युक्रेनच्या तणावात वाढ; भारतीयांना आणण्यासाठी AI चे विमान रवाना
Richa Ghosh
Leopard: मांगरुळकरांत 'बिबट्या' ची दहशत; डोंगररांगा परिसरातील शेतकरी धास्तावला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com