AFC Asian Cup 2023: भारतास मिळाला आशियाई फुटबाॅल करंडक अंतिम पात्रता फेरीच्या आयाेजनाचा मान

एएफसीने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद केले आहे.
AFC Asian Cup 2023
AFC Asian Cup 2023saam tv
Published On

नवी दिल्ली: आशियाई फुटबॉल महासंघाने (Asian Football Confederation) आठ जून २०२२ नंतर होणार्‍या AFC आशियाई फुटबाॅल करडंक २०२३ (AFC Asian Cup China 2023) पात्रता फेरीच्या तिसर्‍या फेरीचे आयोजन करण्याची भारताची बोली स्वीकारली आहे. कोलकाता (Kolkata) येथील व्हीवायबीके येथे स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. (afc 2023 football latest marathi news)

“एएफसी आशियाई (football) पात्रता स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत यजमान चीन पीआरसह १३ संघ आधीच त्यांच्या पूर्वीच्या कामगिरीमुळे पात्र ठरले आहेत. जूनमध्ये होणाऱ्या निर्णायक गट टप्प्यात २४ संघांसाठी अंतिम ११ स्थाने कायम आहेत. भारत (india), कुवेत, किर्गिझ प्रजासत्ताक, मलेशिया, मंगोलिया आणि उझबेकिस्तान या सहा यजमान राष्ट्रांमधील पाचही AFC विभागात असल्याचं एएफसीने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद केले आहे.

AFC आशियाई करंडक (Asian Cup 2023) पात्रता अंतिम फेरी 8, 11 आणि 14 जून 2022 रोजी तीन सामन्यांच्या दिवसांमध्ये, गट विजेते आणि सर्वोत्तम 5 द्वितीय क्रमांकावर असलेल्या संघांना चीनमधील आशियाई करंडक स्पर्धेचे द्वार खूले करुन देईल. पात्रता फेरीच्या अंतिम टप्प्यासाठीचा ड्रॉ 24 फेब्रुवारीस हाेईल.

AFC Asian Cup 2023
Beijing Winter Olympics 2022: मोहम्मद आरिफ खानचे आव्हान संपुष्टात

“आम्ही आशियाई करंडकाच्या तिसऱ्या फेरीच्या पात्रता फेरीचे आयोजन करण्यासाठी बोली लावली होती आणि आमची बोली स्वीकारल्याबद्दल आशियाई फुटबॉल महासंघाचे आभारी आहोत असे AIFF सरचिटणीस कुशल दास यांनी नमूद केले. ते म्हणाले घरच्या मैदानावर खेळणे आणि कोलकात्यात हाेणा-या आशियाई करंडकासाठी पात्र होण्यास संघास मदत हाेईल.

Edited By : Siddharth Latkar

AFC Asian Cup 2023
Elephants: मुलांच्या लग्नात हत्तींचा ठरताेय अडसर; ग्रामस्थांत चिंतेचे वातावरण
AFC Asian Cup 2023
Maratha Reservation: मराठा समाजाला न्याय मिळवून देणार; २६ फेब्रुवारीपासून आमरण उपाेषण : संभाजीराजे छत्रपती
AFC Asian Cup 2023
Bird Flu Effect: १५ हजार कोंबड्यांना नष्ट करण्याच्या माेहिमेस प्रारंभ : ठाणे पशुसंवर्धन विभाग

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com