Beijing Winter Olympics 2022: मोहम्मद आरिफ खानचे आव्हान संपुष्टात

या स्पर्धेत ८८ खेळाडूंनी भाग घेतला. त्यापैकी केवळ ५२ खेळाडू ही शर्यत पूर्ण करू शकले.
Arif Khan in Beijing Winter Olympics 2022
Arif Khan in Beijing Winter Olympics 2022saam tv
Published On

बीजिंग : येथे सुरु असलेल्या बीजिंग हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत (Beijing Winter Olympics 2022) भारताचा स्कीयर आरिफ खान (Indian skier Mohammad Arif Khan) हा बुधवारी झालेल्या पुरुषांच्या स्लॅलम स्पर्धेत (slalom category) शर्यत पूर्ण करू शकला नाही. त्यामुळं या स्पर्धेतील त्याचे आव्हान संपुष्टात आले आहे. (Mohammad Arif Khan Latest Marathi News)

जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील ३१ वर्षीय आरिफने रविवारी जायंट स्लॅलममध्ये ४५ वा क्रमांक पटकावला परंतु यांकिंग नॅशनल अल्पाइन स्कीइंग सेंटरमधील स्लॅलम स्पर्धेत (sports) तो त्याची पहिली शर्यत पूर्ण करू शकला नाही याचे शल्य भारतीयांच्या मनात आहे.

हिवाळी ऑलिम्पिकमध्ये (olympics) पदार्पण करणाऱ्या आरिफला पहिली शर्यत पूर्ण करता न आल्याने दुसऱ्या शर्यतीत तो भाग घेऊ शकला नाही. या स्पर्धेत ८८ खेळाडूंनी (players) भाग घेतला. त्यापैकी केवळ ५२ खेळाडू ही शर्यत पूर्ण करू शकले. जे दुसऱ्या शर्यतीत सहभागी होतील. आरिफने सुरुवात चांगली केली. त्याने पहिला टप्पा 14.40 सेकंदात आणि दुसरा टप्पा 34.24 सेकंदात पूर्ण केला पण अंतिम टप्पा पूर्ण करण्यात तो अपयशी ठरला.

ऑस्ट्रियाचा जोहान्स स्ट्रोल्झ हा पहिल्या शर्यतीत ५३.९२ सेकेंडच्या वेळेसह सर्वात वेगवान स्कीअर ठरला. नॉर्वेचा हेन्रिक क्रिस्टोफर्सन (५३.९४ से.) आणि सेबॅस्टियन फॉस सिल्व्हॅग (५३.९८ सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले.

Indian skier Mohammad Arif Khan
Indian skier Mohammad Arif KhanSaam tv
Arif Khan in Beijing Winter Olympics 2022
Portuguese league: मैदानावरील गैरवर्तनामुळं पोर्तुगालचा स्टार Pepe निलंबीत

बीजिंग हिवाळी ऑलिंपिक २०२२ मध्ये आरिफ खान हा भारताचा (india) एकमेव खेळाडू देशाचे प्रतिनिधीत्व करीत होता. “मला घरी परतताना लाखो लोक पाहत होते. मला मिळालेल्या संधीत मी सर्वोत्तम देण्याचा माझा प्रयत्न केला. पण हवामान अनिश्चित होते, फार काही दिसत नव्हते असे अरिफनं नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Indian skier Mohammad Arif Khan
Indian skier Mohammad Arif Khansaam tv

हिवाळी ऑलिम्पिकच्या दोन स्पर्धांसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय असलेल्या आरिफने जायंट स्लॅलम स्पर्धेत 2:47.24 सेकंदांची वेळ नोंदवून 45वे स्थान पटकावले.

Edited By : Siddharth Latkar

Arif Khan in Beijing Winter Olympics 2022
Shivsena: बॉय का?; नार्वेकरांनी राणेंना त्या फाेनची आठवण करुन देत विचारलं, 'वाजली का तुमच्या मेमरीची घंटी!
Arif Khan in Beijing Winter Olympics 2022
Bombay High Court: उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला फटकारलं, ‘पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही बसवण्याच्या नावाखाली ६० कोटींची उधळपट्टी!’

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com