MP Bajrang Sonawane addressing the media while raising questions over Ajit Pawar’s final journey. Saam Tv
महाराष्ट्र

'त्या' दिवशी अजितदादांसोबत विमानात PA का नव्हता? खासदाराने व्यक्त केला संशय

Ajit Pawar PA Was Not Present On Flight: अजित पवार यांच्या विमान प्रवासाबाबत खासदार बजरंग सोनवणे यांनी गंभीर संशय व्यक्त केला आहे. पीए सोबत का नव्हता? संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Omkar Sonawane

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का? असा संशय शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला होता. आता त्यांनीच अजून एक दाट संशय व्यक्त केल्याने भुवया उंचावल्या आहेत. ते म्हणाले, देशाचे महाराष्ट्राचे नेतृत्व हरवलं आहे. तळागाळातील प्रत्येक प्रश्नाची उकल अजित पवारांना होती. दादा येतील आणि भेटतील असं सर्वांना वाटते. हा प्रसंग दुःखाचा आहे. असे म्हणत त्यांनी अजित पवारांची आठवण काढली.

तसेच राष्ट्रवादीच्या विलनीकरणासंदर्भात हा अधिकार शरद पवारांचा आहे. त्यांचा घरचा विषय आहे. ते एकत्रित निर्णय घेतील. मी संशय व्यक्त केला आहे. मी आरोप केला नाही. सर्वांच्या अस्मितेचा विषय आहे. पुरावे देण्यासारखा विषय नाही. मी संशय व्यक्त केला आहे. याची चौकशी व्हावी हे मला वाटतं. झालेल्या घटनेची पूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी मी करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी भेटणार आहे. माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. दादांचा मृत्यू दुर्दैवी झाला आहे याची चौकशी व्हावी असं मला वाटतं.

अजितदादांसोबत पीए का नव्हता?

पुढे ते म्हणाले, कोणी आरोप करत नाही सर्व शंका व्यक्त करतात तसा घटनाक्रम आहे. अजित पवारांसोबत पीए का नव्हता. मी समोरासमोर जाऊन बोलणारा माणूस आहे. नेहमी सोबत असणारे पीए कुठे गेले होते. त्यादिवशी फक्त गार्ड सोबत होते. मी फक्त संशय व्यक्त केलेला आहे. याबाबत मी संसदेत प्रश्न उपस्थित करणार आहे.

मुख्यमंत्री यांनाही भेटणार आहे. सर्व प्रकरणाची चौकशी योग्य पद्धतीने केले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मला त्यावर विश्वास आहे. ज्यांनी पुरावे मागितले आहेत त्यांना पुरावे कुठून देणार. मी संशय व्यक्त केला असल्याने पुरावे मागणाऱ्यांनीही विचार करावा दुसरे कुठली पुरावे मागू देत मी पुरावे देईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT