बंद कंपनीचं विमान अजितदादांना का दिलं? राष्ट्रवादीच्या आमदाराला वेगळाच संशय, ५० कोटींचाही केला उल्लेख

Ajit Pawar Death : व्हीएसआर कंपनीचे विमान, पायलटचा ५० कोटी विमा आणि विमान सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आमदार अमोल मिटकरी यांनी सखोल चौकशीची मागणी केली असून या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Ajit Pawar plane crash investigation latest updates : अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर नवे संशय समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अत्यंत खळबळजनक संशय व्यक्त केला आहे. 'व्हीएसआर कंपनीने डिसेंबर २०२५ मध्ये आपल्या सर्व पायलट्सचा ५०-५० कोटी रुपयांचा विमा उतरवला होता, त्यातून पायलटला आमिष दाखवून किंवा हिप्नोटाईज करून हे कृत्य करण्यास भाग पाडले का?' (VSR aviation company controversy in Ajit Pawar crash case) असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी या प्रकरणाची तुलना राजीव गांधी हत्या प्रकरण आणि अजमल कसाबच्या मानसिक स्थितीशी केली आहे. विमान नादुरुस्त असतानाही ते २८ तारखेला प्रवासासाठी का दिले गेले आणि पायलटने मेडे कॉल का दिला नाही, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मिटकरी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. ( Ajit Pawar death investigation updates)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com