Earthquake News Saam TV
महाराष्ट्र

Earthquake News: भूकंपाच्या हादऱ्याने दहापेक्षा अधिक घरांना तडे; मराठवाड्यात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Hingoli, Latur, Parbhani Earthquake: यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. आज सकाळी महसूल प्रशासनाने या गावात जाऊन घरांच्या नुकसानीची पाहणी करत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hingoli Earthquake:

मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणीसह यवतमाळ जिल्ह्याला काल सकाळी बसलेल्या भूकंपाच्या हादऱ्याने अनेक ठिकाणी घरांना तडे गेले आहेत. हिंगोलीच्या सावरखेडा गावामध्ये दहापेक्षा अधिक घराच्या भिंती आणि मुख्य खांबांना भेगा पडल्यात. यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. आज सकाळी महसूल प्रशासनाने या गावात जाऊन घरांच्या नुकसानीची पाहणी करत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

हिंगोलीतील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्र

२१ मार्च रोजी सकाळी ६:३० वाजता ४.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे समजले आहे. झालेल्या भूकंपाची खोली १० किलोमीटर असल्याचे दिसत आहे.

मराठवाड्यातील १९९३ च्या भूकंपानंतरचा हा सर्वात मोठा भूकंप आहे. यावेळेस हिंगोली, नांदेड आणि परभणी या मराठवाड्याती जिल्ह्यासह लगतच्या विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व उमरखेड तालुक्यातील अनेक ठिकाणी या भूकंपाचे धक्के बसले.

घराची भींत कोसळली

काल परभणी जिल्ह्यात देखील भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे एका घराची भिंत कोसळली आहे. भींतीत बांधलेल्या अलमारीमधील भांडी देखील खाली कोसळलीत. पहिला भूकंपाचा झटका जाणवताच घरातील सर्वच व्यक्ती बाहेर पळाल्या. त्यामुळे कुणालाही दुखापत झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cheapest Plans: Jio, Airtel आणि Vi चे बजेट प्लॅन, कमी पैशात २८ दिवस कॉलिंग, डेटा अन् बरंच काही...

Bigg Boss 19: या स्पर्धकाला बिग बॉसने दिली सुपर पॉवर; आता घरातील सदस्यांना करणार नॉमिनेट

Maharashtra Politics: महाराष्ट्रात नवं राजकीय समिकरण, याठिकाणी दोन्ही शिवसेना एकत्र येणार? 'त्या' भेटीमुळे चर्चांना उधाण

Prostate Cancer Risk: सब्जाचं जास्त सेवन आरोग्यासाठी धोक्याचं; अ‍ॅलर्जीपासून ते कॅन्सरपर्यंत वाढतो धोका

Gold Rate Today : पुन्हा सोन्याचे दर घसरले, अचानक इतके झालं स्वस्त, वाचा 24K, 22K आणि 18K ताजे दर

SCROLL FOR NEXT