Earthquake News: ब्रेकिंग! पहाटे पहाटे हिंगोली, नांदेड अन् परभणीमध्ये भूकंपाचे धक्के; भितीने नागरिक घराबाहेर

Hingoli, Latur, Parbhani Earthquake: हिंगोली, लातूर, परभणी जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामध्ये कुठल्याही प्रकारचे नुकसान किंवा जिवीतहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.
 Earthquake in Hingoli, Latur, Parbhani
Earthquake in Hingoli, Latur, Parbhani Saam tV

राजेश काटकर, संदिप भोसले, प्रतिनिधी|ता. २१ मार्च २०२४

Hingoli Earthquake: 

हिंगोली, लातूर, परभणी जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामध्ये कुठल्याही प्रकारचे नुकसान किंवा जिवीतहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. परंतु भूकंपाचे धक्के जाणवल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के..

आज सकाळी सहा वाजून ८ मिनिटांनी व सहा वाजून १९ मिनिटांनी हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर, वारंगा फाटा जिल्हा हिंगोली या ठिकाणी भूकंपाच्या केंद्रबिंदूची नोंद झाली आहे. हिंगोली वसमत, औंढा व कळमनुरी तालुक्यातील काही गावांमध्ये तसेच नांदेड जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये भूगर्भातून आवाज तसेच सौम्य धक्का जाणवला आहे .

या भूकंपाची नोंद लातूर येथील भूकंपमापक केंद्रात 4.5 व 3.6 रिश्टर स्केल इतकी झाली आहे. कुठल्याही प्रकारच नुकसान किंवा जिवीत हानी या परिसरात झाली नसल्याची माहिती मिळत आहे. मात्र या भुकंपाचे सौम्य धक्के हे, नांदेड परभणी, आणि लातूर जिल्ह्यात देखील जाणवले आहेत.त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आव्हान लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 Earthquake in Hingoli, Latur, Parbhani
Lok Sabha Elections 2024: आचारसंहितेच्या फेऱ्यात अडकली अवकाळीची मदत; शेतकऱ्यांची प्रतिक्षा वाढली

परभणी जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के..

परभणी जिल्ह्यातही भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे एका घराची भिंत कोसळली भिंतीत बांधलेल्या अलमारीमधील भांडे खाली कोसळली. पहिला भूकंपाचा झटका ६ वाजून ६ मिनिटांनी तर दुसरा भूकंपाचा झटका ६ वाजून १६ ते १८ मिनिटाला जाणवला. पहिला भूकंपाचा झटका अंदाजे १५ ते १८ सेकंदाचा होता तर दुसरा भूकंपाचा झटका अंदाजे ६ ते ८ सेकंदाचा होता.

भूकंपाच्या पहिल्या झटक्यामध्ये कौसडी येथील व इखे गल्लीमधील बालासाहेब मुंजाजी इखे यांच्या घरातील भिंतीत बांधलेली अलमारीची भिंत कोसळली. यावेळी घरातील सर्वच व्यक्ती बाहेर असल्याने कोणतीही दुखापत झाली नाही. दरम्यान भूकंपाचे झटके जाणवल्याने घरात झोपलेले सर्वच व्यक्ती रस्त्यावर आले होते. या भूकंपाच्या झटक्यामुळे परभणी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. (Latest Marathi News)

 Earthquake in Hingoli, Latur, Parbhani
Sangli Politics : जागावाटपावरुन ठाकरे गट-काँग्रेसमध्ये जुंपली; सांगलीच्या जागेवरुन विश्वजीत कदमांचा थेट उद्धव ठाकरेंना सवाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com