महापुरातील नुकसान भरपाई मिळावी यासाठी शिरोळ मध्ये मोर्चा! Saam Tv
महाराष्ट्र

महापुरातील नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी शिरोळ मध्ये मोर्चा!

संभाजी थोरात, कोल्हापूर

गेल्या पंधरा वर्षात पश्चिम महाराष्ट्राला तीन महापुराना सामोरे जावे लागलं. या तीनही पुरात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याच मोठं नुकसान झालं. या नुकसानीची भरपाई समाधानकारक न मिळाल्याने नागरिक आक्रमक झाले असून आता रस्त्यावर उतरले आहेत.Morcha in Shirol to seek compensation for floods

नुकत्याच येऊन गेलेल्या महापूरामुळे अर्ध्या महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजला होता तळीये मध्ये दरडी पडून आख्ख गावं होत्याच नव्हतं झालं. तर चिपळूनChiplun मध्ये संपुर्ण शहरात पाणी घुसल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक निकसान झालं या बरोबर सगळ्यात जास्त नुकसानLoss झालं ते पश्चिम महाराष्ट्राचWestern Maharashtra आणि सलग तीनवेळा आलेल्या महापूरामुळे कृष्णाकाठच्या लोकांना सावरायला वेळही मिळाला नाही अशात शासनाची नदत म्हणजे तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार या सर्व त्रासाला कंटाळून आता कोल्हापूरKolhapur मधाल शिरोळ तालुक्यातील नागरिक आता रस्त्यावरती उतरले आहेत.

महापुरात राज्यातील अनेक तालुक्याच नुकसान केलं त्यातील शेतीच सर्वांत जास्त नुकसान शिरोळ तालुक्यात झालंय. तालुक्यातील 42 गावं बाधित होतात. येथील हजारो हेक्टर ऊस शेती उध्वस्त झाली त्यामुळे येथील नागरिक अडचणीत आलेत. या पूरग्रस्तांना मदत देताना शासनाच्या अटी आणि नियमांमुळे काहीच मिळत नाही. त्यामुळे पूरग्रस्तांच्या पदरी काहीच पडत नाही. त्यामुळे ऊसाला सरसकट 2 हजार रुपये गुंठा मदत द्यावी, शेतीपूरक व्यवसायाचे पंचनामे करून मदत दयावी, पुढील दोन महिने जनावरांना चारा शासनाकडून मिळावा, मृत जनावरांसाठी 40 हजार रुपये मिळावे, भूमीहीन शेतकऱ्यांना 5 लाख बिनव्याजी कर्जInterest free loan मिळावे यासह अनेक मागण्यांसाठी आज शिरोळ मध्ये मोर्चा काढण्यात आला होता.

महापुरात अनेक कुटुंबांचे संसार वाहून गेले आहेत तर व्यवसायBusiness ही कोलमडले असून. शेतीच कधीही न भरून येणारे नुकसान झालं आहे, त्यामुळे शासनाने या पूरग्रस्तांच्या मागण्यांचा विचार करणं गरजेचं आहे अशी एकंदरीत सर्व आंदोलनकर्त्यांची इच्छाआहे.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

SCROLL FOR NEXT