अंबरनाथ : हातावर पोट असलेले रिक्षाचालक कोरोना काळात जवळपास वर्षभर घरी होते. मात्र तरीही त्यांनी हप्ते भरले नाहीत, म्हणून फायनान्स कंपन्या त्यांच्या रिक्षा जप्त करून नेतायत. याविरोधात रिक्षाचालकांनी आज अंबरनाथमध्ये बोंबाबोंब आंदोलनMovement केलं.हे आंदोलनास प्रहार संघटनेचे जितेंद्र पाटोळे यांनी सुद्धा पाठिंबा दिला होता.Rickshaw pullers' agitation against finance companies
हे देखील पाहा-
मागील वर्षभर कोरोनामुळेCorona जनजीवन पुरतं विस्कळीत झालं होतं. हातावर पोट असलेले रिक्षाचालक जवळपास वर्षभर घरी होते. यापैकी बहुतांशी रिक्षाचालकांनी त्यांच्या रिक्षा कर्जLoan काढून घेतलेल्या आहेत. मात्र रिक्षाचालक घरी असतानाही त्यांच्याकडे फायनान्स कंपन्यांकडून हप्ते भरण्यासाठी तगादा लावला जातोय. तसंच हप्ते न भरल्यास त्यांच्या रिक्षा उचलून नेल्या जातायत. फायनान्स कंपनीचे रिकव्हरी एजंट हे गुंड प्रवृत्तीचे असून त्यांना विरोध केल्यास मारहाणीसारखे प्रकारही घडत असल्याचा रिक्षाचालकांचा आरोप आहे.
अशा परिस्थितीत आम्ही घर चालवायचं? की हप्ते भरायचे? असा रिक्षाचालकांचा सवाल आहे. फायनान्स कंपन्यांच्या Finance companiesया दादागिरीविरोधात अंबरनाथ आणि बदलापूरमधील रिक्षाचालकांनी आज अंबरनाथच्या तहसील कार्यालयाबाहेर बोंबाबोंब आंदोलन केलं. फायनान्स कंपन्यांना सरकारने समज द्यावी आणि आम्हाला कर्ज फेडण्यासाठी वाढीव अवधी मिळावा, अशी रिक्षाचालकांची मागणी आहे.
Edited By-Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.