Maharashtra Infrastructure Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra New Railway Line: मोदी सरकारचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट! दोन रेल्वे मार्गांना मंजुरी; कोणाला होणार फायदा?

Maharashtra 2 New Railway Line Modi Government Cabinet Decision: केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा केली आहे.महाराष्ट्रासाठी दोन नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे. यामुळे अनेकांना फायदा होणार आहे.

Siddhi Hande

मोदी सरकारचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट

दोन नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी

११ हजार ४२० कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर

केंद्र सरकारने महाराष्ट्राला मोठं गिफ्ट दिलं आहे. मोदी सरकारने महाराष्ट्रातील दोन रेल्वे मार्गांना मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना खूप फायदा होणार आहे. दोन मोठ्या प्रकल्पांना मंजुरी दिली असून हे प्रकल्प ११ हजार ४२० कोटी रुपयांचे असणार आहेत. या रेल्वे मार्गामुळे महाराष्ट्र शेजारच्या राज्याला जोडला जाणार आहे.

रेल्वे मार्गिकेला मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भुसावळ ते वर्धा तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेला मंजुरी देण्यात आली आहे. हा रेल्वे मार्ग ३१४ किलोमीटर लांबीचा असणार आहे. या प्रकल्पाचा खर्च ९११७ कोटी रुपये असणार आहे. या रेल्वे मार्गाचं काम २०३० पर्यंत पूर्ण होईल.

महाराष्ट्र अन् छत्तीसगडला जोडण्यासाठी नवा रेल्वे मार्ग

केंद्र सरकारने आणखी एक नवा रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे. यामुळे महाराष्ट्र आणि छत्तीसगड जोडले जाणार आहे. हा नवीन रेल्वे मार्ग गोंदिया ते दोडडगदरम्यान होणार आहे. हे कामदेखील २०३०-२१ पर्यंत पूर्ण होईल, असं सांगण्यात येत आहे. हा रेल्वे मार्ग ८४.१० किलोमीटर लांब असणार आहे.

या नवीन रेल्वे मार्गामुळे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्ये जोडली जाणार आहे. यामुळे दुरंग जंक्शन आणि नागपूर, बल्लारशाह जंक्शनमधील मालवाहतूकीसाठी बायपास तयार होणार आबे. या मार्गामुळे शेती, खाणकाम अशा अनेक व्यवसायांना चालना मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : आरोग्याच्या तक्रारी वाढणार, जवळच्या लोकांकडून दगाफटक्याची शक्यता; ५ राशींच्या आयुष्यात होणार मोठी घडामोड

भीषण अपघात! धावत्या बसवर कोसळला डोंगराचा ढिगारा, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : पवईमध्ये पेट्रोलपंपावर मोटारसायकला लागली भीषण आग

बाहेरच्या काजळावर विश्वास नाही? मग घरच्या घरी तयार करा लाँग लास्टिंग काजळ

Sudden cardiac death: अचानक हार्ट अटॅक येऊन मृत्यू का होतो? कधीच समजून येत नाहीत पण संकेत देणारी कारणं

SCROLL FOR NEXT