MNS Leader Attacked in mahad saam tv
महाराष्ट्र

MNS Leader Attacked : मनसेच्या शहरप्रमुखाला बेदम मारहाण, निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वादातून हल्ला झाल्याचा संशय

MNS Worker Attacked : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं असतानाच, मनसेच्या नेत्यावर हल्ला झाल्याची घटना महाडमध्ये घडली.

Nandkumar Joshi
  • मनसेचे महाड शहरप्रमुख पंकज उमासरे यांना मारहाण

  • चवदार तळे येथील दुकानात शिरून केली मारहाण

  • महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

सचिन कदम, महाड | साम टीव्ही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळं सगळीकडंच वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आहेत. पण काही ठिकाणी टीका-टिप्पणीचा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला आहे. महाडमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

मनसेचे महाड शहरप्रमुख पंकज उमासरे यांना काही जणांनी बेदम मारहाण केली. ही मारहाण गंभीर स्वरुपाची आहे. उमासरे यांचे चवदार तळे येथे दुकान आहे. त्या दुकानात घुसून हल्लेखोरांनी मारहाण केली.

उमासरे यांनी दोन दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांच्याविरोधात एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती. याच रागातून त्यांना मारहाण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणात वृत्त प्रसिद्ध करेपर्यंत अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पंकज उमासरे यांच्यावर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उमासरे यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Honeymoon Destinations: लग्नानंतर हनिमूनसाठी महाबळेश्वर, माथेरान कशाला? भारतातली ही खास अन् शांत ठिकाणं ठरतील बेस्ट

Punha Shivajiraje Bhosle Collection : 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा हाऊसफुल, वीकेंडला कमाई किती?

नाशिकमध्ये राजकीय भूकंप! दोन बड्या नेत्यांची शरद पवार गटातून हकालपट्टी, भाजपचं कमळ हाती घेण्याच्या तयारीत

Accident News : पुण्यात अपघाताचा थरार! दोन जणांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर

Maharashtra Live News Update: महाडमध्ये मनसे पधिकाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT