uddhav thackeray raj thackeray x
महाराष्ट्र

मोठी बातमी! ठाकरे बंधूंची मुंबईसह ७ जिल्ह्यांत युती झाल्यात जमा; पुढचा मास्टरप्लॅन काय?

MNS–Shiv Sena (UBT) Alliance: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंमध्ये चर्चा वाढली. दरम्यान याच पार्श्वभूमीवर संभाव्य युतीची शक्यता वर्तवली जात आहे.

Bhagyashree Kamble

  • गेल्या पाच महिन्यांत ठाकरे बंधूंच्या १२ वेळेस भेटीगाठी

  • भेटीगाठी वाढल्यामुळे राजकीय वर्तुळात युतीच्या चर्चांना उधाण

  • सात जिल्ह्यांमध्ये ठाकरे बंधू संयुक्तपणे निवडणूक लढवण्याची शक्यता

गेल्या ५ महिन्यांत ठाकरे बंधूंची तब्बल १२ वेळा भेट झाली. ५ जुलै ते २७ नोव्हेंबर या कालावधीत दोघांमध्ये अनेकदा चर्चा झाली. यामुळे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, अद्याप अधिकृतपणे युतीची घोषणा करण्यात आलेली नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधुंच्या भेटींना महत्व प्राप्त झालं आहे. याच दरम्यान, ठाकरे बंधूंबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईसह राज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये ठाकरे बंधू एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईसह ७ जिल्ह्यांत ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. मुंबई, ठाणे, वसईमध्ये शिवसेना - मनसे युती करणार असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक, पुणे तसेच पिंपरी चिंचवडमध्ये देखील ठाकरे बंधू युती करून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

७ जिल्ह्यांमध्ये ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू असून, या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीला रोखण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना सोबत घेण्यावर आग्रही असल्याचं म्हटलं जात आहे. भाजप तसेच एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्या विरोधात मैदानात उतरण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज आहेत. दरम्यान, निवडणूक जरी जाहीर केली नसली तरी, ठाकरे बंधूंनी मैदानात उतरण्यासाठी तयारी केली असल्याचं बोललं जात आहे

मुंबई महापालिका निवडणुकीतील जागावाटपावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा सुरू झाली असल्याची माहिती आहे. गुरूवारी उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. मुंबई महापालिकेत एकूण २२७ जागा असून, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसे ७५ ते ८० जागांची अपेक्षा आहे. प्रत्येक विधानसभेत किमान १ जागा, तर मराठी बहुल भागांमध्ये २ ते ३ जागा मिळाव्यात, अशी मनसेची मागणी आहे. दरम्यान, निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नसली तरी, जागावाटपाची जोरदार तयारी सुरू आहे. हे ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी आणि हालचालींवरून स्पष्ट होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Stone: कोणत्या भाज्या कच्च्या खाऊ नयेत? किडनी स्टोनचा धोका टाळण्यासाठी उपाय

Mumbai : लिंक रोड,टनेल रोड ते कोस्टल रोड, मुंबईचा कायापालट होणार ; मेट्रोच्या बड्या अधिकाऱ्यानं सांगितला रोड मॅप

Bigg Boss 19: 'बिग बॉस'च्या घरात राडा, मालतीने फरहानाला लाथ मारली अन् टेबल..., पाहा VIDEO

Processed Food Side Effect: जास्त प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने होतात 'हे' नुकसान, आजपासूनच घ्या काळजी

Maharashtra Live News Update: एकाच व्यासपीठावर दोन पिक्चर, भाजप आणि शिवसेनेची एकाच मंचावर सभा

SCROLL FOR NEXT