जाग आली अन् बाजुला २ पुरूष, स्ट्रगलिंग मॉडेलनं कॉलेज तरूणीला फसवलं, अश्लील VIDEO व्हायरल करण्याची धमकी अन्..

College Girl Assaulted and Filmed in Andheri: मुंबईच्या अंधेरीत स्ट्रगलिंग मॉडेलनं २२ वर्षीय तरूणीला गुंगीचे औषध दिलं. नंतर २ पुरूषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. सध्या पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
College Girl Assaulted and Filmed in Andheri
College Girl Assaulted and Filmed in AndheriSaam Tv News
Published On

मुंबईतील अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. तरूणीला आधी कोल्डड्रिंकमधून गुंगीचं औषध देण्यात आलं. बेशुद्ध झाल्यानंतर तरूणीच्या अब्रूचे लचके तोडले. दोघांनी आळीपाळीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नराधमांनी लैंगिक अत्याचारानंतर पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. या प्रकरणी सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी मुंबईतील अंधेरी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. तसेच स्ट्रगलिंग मॉडेल सुषमा राव यांच्या कार्यालयात गरम मसाला प्रॉडक्टच्या मार्केटिंगसाठी पार्ट टाईम जॉब करीत होती. दरम्यान, काही दिवसांसाठी भाड्याने घेतलेल्या खोलीत काम चालू राहिल, असं सुषमानं पीडितेला सांगितलं.

College Girl Assaulted and Filmed in Andheri
नवलेनंतर 'या' उड्डाण पुलावर भीषण अपघात, ८-१० गाड्या एकमेकांवर आदळल्या, काचा फुटल्या अन्...

सुषमानं पीडितेला अंधेरीच्या जेबीनगर येथील लॉजचा पत्ता दिला. मसाला प्रॉ़डक्टसाठी केवळ दोघेच काम करत होते. दरम्यान, याच कार्यलयात पीडितेला गुंगीचं औषध देण्यात आलं. पीडिता बेशुद्ध होताच सुषमानं २ तरूणांना बोलावून घेतलं. दोन्ही नराधमांनी पीडितेवर आळीपाळीनं लैंगिक अत्याचार केला.

College Girl Assaulted and Filmed in Andheri
'भाड्यानं मुलगी हवी?' वृद्ध महिलेची अजब मागणी, TVवर दिली जाहिरात; फ्लॅट अन् पगारही देणार

तरूणीला काही वेळातच जाग आली. तेव्हा तिच्या शेजारी २ तरूण पाहून तिला धक्काच बसला. नंतर सुषमानं पीडितेला अश्लील फोटो दाखवले. यानंतर तरूणीनं घटनास्थळावरून पळ काढला. तसेच अंधेरी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. तसेच सुषमा आणि तिच्या २ साथीदारांविरेधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला.

College Girl Assaulted and Filmed in Andheri
४८ दशलक्ष रोजगार अन् ४.१ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक; हरित अर्थव्यवस्थेमुळे भारतातील तरुणांना नोकऱ्यांची सुवर्णसंधी

या प्रकरणी प्रमुख आरोपी सुषमा रावला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच २ फरार आरोपींचा सध्या शोध सुरू आहे. पोलीस लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास करीत आहेत. या घटनेनंतर अंधेरीत खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com