MNS Raj Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Raj Thackeray: ...कोणताही पुरावा नाही, २००८ मधील हिंसाचार प्रकरणातील राज ठाकरेंविरोधातील गुन्हा हायकोर्टाने केला रद्द

Raj Thackeray Relief From Bombay High Court: राज ठाकरे यांच्या प्रक्षोभक भाषण आणि चिथावणी देण्याबाबतच्या रेकॉर्डवरील साहित्याचा अभाव असल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई हायकोर्टाने त्यांच्यावरील हिंसाचार भडकवण्याचा आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

Priya More

आवेश तांदळे, मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Leader Raj Thackeray) यांना मुंबई हायकोर्टाने (High Court) दिलासा दिला आहे. २००८ मध्ये हिंसाचार आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल राज ठाकरे यांच्याविरुद्धचा खटला मुंबई हायकोर्टाने रद्द केला. राज ठाकरे यांच्या प्रक्षोभक भाषण आणि चिथावणी देण्याबाबतच्या रेकॉर्डवरील साहित्याचा अभाव असल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई हायकोर्टाने त्यांच्यावरील हिंसाचार भडकवण्याचा आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात भडकावण्याचा कोणताही पुरावा नसल्याचे सांगत हायकोर्टाने राज ठाकरेंविरोधातील गुन्हा रद्द केला आहे.

२००८ मध्ये म्हणजे १६ वर्षे जुन्या याप्रकरणावर आज सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात या खटल्यातील दोषमुक्तीचा अर्ज फेटाळणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राज ठाकरे यांच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. हे प्रकरणी २१ ऑक्टोबर २००८ चे आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात मनसे कार्यकर्त्यांनी राज्य परिवहन बसवर दगडफेक करण्यात आली होती. हिंसाचाराला प्रोत्साहन आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यभर हिंसचार झाला होता. राज ठाकरे यांना अटक केल्यानंतर करमाळावरून तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसवर दगडफेक करण्यात आली होती. त्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा आज मुंबई हायकोर्टाने रद्द केला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना दिलासा मिळाला.

दरम्यान, राज ठाकरे यांनी २००८ मध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशातून आलेल्यांनी महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या नोकऱ्या घेतल्याचा आरोप करत याला विरोध केला होता. मुंबईत रेल्वे प्रवेश परीक्षेला बसलेल्या काही उत्तर भारतीयांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. मनसे कार्यकर्त्यांना यासाठी राज ठाकरे यांनी भडकावल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना अटकही झाली होती. पण अटक केलेल्या राज ठाकरे यांना सोडण्यात यावे यासाठी राज्याभर हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. अटकेनंतर त्यांची सुटका झाली होती. याप्रकरणी राज ठाकरे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT