जळगाव, ता. २१ एप्रिल २०२४
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जळगावमधील अंतर्गत नाराजीनाट्य संपवण्यासाठी तसेच महाविकास आघाडीचे रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी ते जळगावमध्ये आले. यावेळी जामनेर येथे शरद पवार यांची जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला.
काय म्हणाले शरद पवार?
"शेतकरी व नवयुवकांचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. जुमलेबाज नेत्यांकडून लोकांची सुटका करायची आहे. नवी पिढी बदल करायच्या इच्छेने उभी आहे. दक्षिणेतील सर्व राज्य एकत्रित येऊन इंडिया आघाडीच्या माध्यमातून काम करत आहेत. सत्ताधाऱ्यांमुळे ही एकी करावी लागली," असे शरद पवार यावेळी म्हणाले.
मोदींवर टीका..
"मोदी भाषण अनेक करत आहे. बळीराजासाठी काय केलं ते सांगत नाहीत. ते देशाचे नव्हे तर भाजपच्या पंतप्रधानांप्रमाणे जवाहरलाल नेहरुंवर टीका करतात. दहा वर्ष झाले त्यांच्या हातात सत्ता दिली आहे त्यांनी सांगितले प्रत्येक वस्तूचे भाव कमी करेल. मात्र कमी न करता भाव वाढ झाली," अशी टीकाही शरद पवार यांनी केली.
घटनेवर हल्ला करण्याचे काम सुरू..
"पंतप्रधानांचे कोणतेही भाषण ऐका, ते कधी इंदिरा गांधीवर, कधी राहुल गांधींवर बोलत असतात. उद्धव ठाकरेंवर व्यक्तिगत टीका करतात. मात्र तुम्ही स्वतः काय केलं ते सांगा. नंतर दुसऱ्यांवर टीका करा. या सरकारकडून आंबेडकरांनी लिहलेल्या घटनेला धक्का लावण्याचे काम सुरू आहे, देशाच्या घटनेला धक्का लावणाऱ्यांना उध्वस्त केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा यावेळी शरद पवार यांनी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.