Raj Thackeray on Beed Santosh Deshmukh killed case Saam Tv News
महाराष्ट्र

तुमच्या नसानसात एवढी क्रुरता भरली असेल तर...; संतोष देशमुख प्रकरणावर राज ठाकरेंचं रोखठोक भाष्य, म्हणाले...

Raj Thackeray on Santosh Deshmukh Murder Case : आज मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकणावरुन रोखठोक भाष्य केलं. ते गुडीपाडव्याच्या निमित्ताने होणाऱ्या मेळाव्यात बोलत होते.

Prashant Patil

मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. या प्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारीचं भीषण वास्तव समोर आलं. खंडणी प्रकरणावरुन आणि राखेच्या तस्करीवरुन गुंडगिरी निर्माण झाल्याचं चित्र आहे. यावर आता राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळावात रोखठोक भाष्य केलं आहे. 'तुमच्या नसानसांमध्ये एवढी क्रुरता भरली असेल ना, तर मी दाखवेन जागा तेथे जा...,' असं म्हणत राज ठाकरेंनी नराधमांना चांगलंच फटकारलं.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, बीडमधील सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली. किती घाणेरड्या पद्धतीने मारावं. नसानसांमध्ये एवढी क्रुरता भरली असेल ना तर मी दाखवीन जागा तेथे जा. हत्या झाली कशातून? ती पवनचक्की, तिकडची ती चैन, तिकडच्या प्रकल्पातून निर्माण होणारी राख आहे त्यातून. मी आजपर्यंत ऐकलं होतं राखेतून फिनिक्स पक्षी उभारी घेतो. पण आमच्याकडे राखेतून गुंडं तयार होतात.

बीडमध्ये विषय होता फक्त पैशांचा, वाल्मिक कराड आणि ज्या आरोपींची नावं येतायत, हे सर्व खंडणीसाठी. संतोष देशमुखांनी त्याला विरोध केला. त्याठिकाणी कोणीही असतं तरी त्याचं देशमुखांप्रमाणेच केलं असतं. विषय होता पैशांचा, विषय होता खंडणीचा, विषय होता खंडणीला विरोध करणाऱ्यांचा. आम्ही लेबल काय लावलं, वंजारींनी मराठ्याला मारलं.

राज ठाकरेंनी पुढे जातीच्या विषयावर रोखठोक भूमिका मांडली. आपण कशात गुंतून पडतोय, तुम्हाला गुंतवलं जातंय, राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवत आहेत. त्यामध्ये गुंतून राहा. मुलांच्या शिक्षणाचा विषय आणू नका, शेतकरी रोज आत्महत्या करतायत, दिवसाला ७ आत्महत्या होतयत. रोजगार निर्माण होत नाहीत, त्याकडे लक्ष देऊ नका. असंख्य मुलं आणि मुली मराठवाडा सोडून पुण्याकडे येतायत, दुर्लक्ष करा त्याच्याकडे. आपल्याला राजकारण्यांनी जातीपातीत अडकवलंय, असं म्हणत राज ठाकरेंनी फटकेबाजी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT