Raj Thackeray Speech :  Saam tv
महाराष्ट्र

BMC Election : महापालिकेची ही शेवटची निवडणूक, हातातून मुंबई गेली तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले, VIDEO

raj thackeray on BMC Election : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीवर राज ठाकरे यांनी मोठं भाष्य केलं आहे. ते शिवडीत एका महोत्सवात बोलत होते.

Vishal Gangurde

शिवडीतील कोकण महोत्सवाला राज ठाकरेंची हजेरी

मुंबई महापालिका निवडणुकीवर राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

मराठी माणसांसाठी राज ठाकरेंचं मोठं आवाहन

आगामी निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. 'मराठी माणसासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटची निवडणूक असेल. गाफील राहिला तर हातातून गेली समजा. ते लोक थैमान घालतील, असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला. ते शिवडीतील कोकण महोत्सवात बोलत होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवडीत विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २०३ येथील कामगार मैदानात कोकण महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना आगामी निवडणुकीवर महत्वाचं भाष्य केलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, थोडे दिवस थांबा भाषणे सुरूच होतील. 11 वर्षांपासून कोकण महोत्सव साजरा होत आहे. मला फक्त जाता जाता एवढीच गोष्ट सांगायची आहे. रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा. ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे. मतदार याद्यांमध्ये जे काही सुरू आहेत, त्यावर लक्ष ठेवा. मतदार खरे की खोटे आहे, याच्यावरही तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे'.

'मराठी माणसांसाठी आगामी मुंबई पालिकेची निवडणूक शेवटची निवडणूक असेल. आपण गाफील राहिलो, तर मुंबई हातातून गेली समजा. एकदा काय मुंबई हातातून गेली तर आपल्याला कोणालाही जमणार नाही. गाफील राहू नका एवढेच सांगायचं आहे. मुंबई आपल्या हातातून गेली तर हे लोक थैमान घालतील, असेही ते म्हणाले.

अरविंद सावंत काय म्हणाले?

अरविंद सावंत म्हणाले, 'गावात सगळं वाटोळं झालं आहे. कामगार मैदानाचा मोठा इतिहास आहे. अनेक चळवळी येथून सुरु झाल्या आहेत. मनसे बुलाया है, मै दिलसे आया है. आता गंगा जमुना एकत्र आल्या आहेत. मराठी माणसांसाठी एकत्र आलो आहोत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT