

पुण्यातील औंध आणि सिंध सोसायटीमध्ये बिबट्या दिसला
वनविभागाकडून थर्मल ड्रोनसह परिसराची काटेकोर तपासणी
बिबट्याच्या दहशतीमुळे काही नागरिकांचं आंदोलन
वन विभागाकडून सतर्क राहण्याचं आवाहन
अक्षय बडवे, साम टीव्ही
पुणे शहरात कोयता गँगने नागरिकांना हैराण केलं आहे. त्यानंतर आता ग्रामीण भागातील नागरिकांची झोप उडवणाऱ्या बिबट्यांची शहरात एन्ट्री झाली आहे. जिल्ह्यापापोठ पुणे शहरातही बिबट्याने शिरकाव केल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. पुण्यातील औंध आणि सिंध सोसायटी अशा मध्यवर्ती भागात बिबट्याचा प्रवेश झाला आहे. बिबट्याच्या एन्ट्रीमुळे वनविभाग अलर्ट झालं आहे.
पुण्यातील औंध आणि सिंध सोसायटीमध्ये बिबट्या पहाटे चार वाजता काही स्थानिकांना आढळला. बिबट्याने शिरकाव केल्याची माहिती मिळताच तात्काळ वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी औंध परिसरात धाव घेतली. आज पहाटे ४ वाजल्यानंतर सदर बिबट्या कोणत्याही ठिकाणी विश्वसनीय पुराव्यासह दिसून आलेला नाही, अशी माहिती वनविभागाने दिली आहे.
सिंध कॉलोनीत परिसरात आढळलेल्या बिबट्याच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर पुणे वन विभाग आणि रेस्क्यू टीम सतत घटनास्थळी उपस्थित राहून शोधमोहीम राबवत आहेत. थर्मल ड्रोनसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून परिसराची काटेकोर तपासणी सुरू झाली आहे. बिबट्याच्या एन्ट्रीच्या पार्श्वभूमीवर कृपया सतर्क राहावे, परंतु घाबरून जाण्याचे कारण नाही, असं आवाहन वन विभागाने केलं आहे.
बिबट्याच्या दहशतीमुळे पुण्यात नागरिकांनी पिंजऱ्यात बसून आंदोलन केलं. पुण्यातील शेवाळवाडी जवळील भवरा वस्तीतील नागरिकांनी पिंजऱ्यात बसून आंदोलन केलं. या वस्तीवर बिबट्या धुमाकूळ घालत आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा, या मागणीसाठी स्थानिकांनी आंदोलन केलं. आंदोलनामुळे वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस दाखल झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.