Maharashtra Politics : मनसेसोबत आघाडीवरुन काँग्रेसमध्ये मतभेद; वडेट्टीवारांचं समर्थन, गायकवाडांचा विरोध, VIDEO

Maharashtra Political News : शरद पवार आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत सकारात्मक असताना काँग्रेसमध्ये मात्र मतभेद उफाळून आलेत..मनसेला सोबत घेण्यावरुन कोणते नेते आमने-सामने आलेत... पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
local body election
Maharashtra Politicssaam tv
Published On

मारहाण करणाऱ्या पक्षासोबत म्हणजेच मनसेसोबत युती करणार नाही, अशी गर्जना करणाऱ्या काँग्रेसमधील मतभेद उघड झालेत.. राज ठाकरेंना सोबत घेण्यावरुन काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आमने-सामने आलेत...भाजपविरोधात मनसेला सोबत घेण्याकडे वडेट्टीवारांचा कल आहे तर वर्षा गायकवाडांनी मनसेला सोबत घेण्याला जोरदार विरोध केलाय..दरम्यान काँग्रेसचा उल्लेख आमिबा असा करत मनसेनं जहरी टीका केलीय..

मनसेबाबत काँग्रेसमध्येच दोन मतप्रवाह असल्याचं समोर आल्यानंतर वर्षा गायकवाडांनी जरा मवाळ भूमिका घेतलीय...आपण फक्त मुंबईपुरतं बोलत असल्याची सारवासारव गायकवाडांनी केलीय..

खरंतर आधी हिंदीसक्तीच्या विरोधातील मोर्चातून ठाकरे बंधू एकत्र आलेत... त्यानंतर निवडणूक आयोगाविरोधातील सत्याच्या मोर्चात ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकीची वज्रमूठ आवळली... मात्र महापालिका निवडणुकीआधी झालेल्या काँग्रेसच्या शिबिरात काँग्रेस नेत्यांनी मनसेला सोबत घेण्यास विरोध केलाय... तर दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीने मात्र युतीबाबत सकारात्मक भूमिका घेतलीय..

local body election
Fact Check : म्हशीनं पाजलं बिबट्यांना दूध? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात एकीचा नारा दिला... त्याचा परिणाम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 जागांवर विजय मिळवता आला...मात्र विधानसभेला शेवटपर्यंत जागा वाटपावर रस्सीखेच कायम राहिल्यानं त्याचा फटका महाविकास आघाडीला बसल्याची शक्यता आहे...

local body election
शिवसेनेचे एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे; नगराध्यक्ष आणि वीस ते पंचवीस उमेदवारांना अपक्ष लढावं लागलं

आता राज ठाकरेही सोबत येण्याची शक्यता असल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपविरोधात मजबूत आघाडी निर्माण होऊ शकते... त्यामुळे इतिहासातून धडा घेऊन सर्व छोट्या पक्षांना एकत्र करण्यात महाविकास आघाडीला यश मिळणार की आघाडीआधीच मतभेदाचं बिज रोवलं जाणार... यावर सत्तेचं समीकरण अवलंबून असणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com