Uddhav Thackeray News, Shiv Sena Latest News, Uddhav Thackeray Latest News, Satara , Shambhuraj Desai  saam tv
महाराष्ट्र

Satara : उद्धव ठाकरेंवर शंभूराज देसाईंचा गंभीर आराेप; आता कारण तेच सांगू शकतील...! (व्हिडीओ पाहा)

गडचिराेलीचे तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा नाकारली.

ओंकार कदम

सातारा : राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आमदार शंभूराज देसाई (shambhuraj Desai) यांनी आज (शुक्रवार) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर गंभीर आराेप केले आहेत. साम टीव्हीशी सातारा (satara) येथे विशेष मुलाखत देताना आमदार देसाई म्हणाले गडचिराेली (gadchiroli) जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या जीवास धाेका हाेता. याबाबतची गृह खात्याने शहनिशा केल्यानंतर शिंदे यांना झेड पल्स सुरक्षा देण्याची तयारी दर्शवली हाेती. परंतु माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेता येणार नाही असं मला स्वत:ला माताेश्रीतून (Matoshree) माझ्या निवासस्थानी दूरध्वनी करुन मला सांगितलं. दरम्यान याबाबत आता तेच (उद्धव ठाकरे) नेमका काय उद्देश हाेता हे सांगू शकतील असेही एका प्रश्नावर देसाईंनी नमूद केले. (shambhuraj desai news)

आमदार देसाई म्हणाले माआेवादी संघटनांकडून एकनाथ शिंदे यांच्या जिवास धाेका हाेता असं पत्र शिंदे यांना आलं हाेतं. त्यांनी ते पत्र गृह खात्याकडे साेपविले हाेते. आमच्या विभागाने त्याची चाैकशी केली. त्यानंतर विधान परिषदेत देखील याबाबत प्रश्न उपस्थित झाला हाेता. त्यावर उत्तर देताना मी पत्राबाबतची सुरु असलेल्या चाैकशी बाबतची माहिती सभागृहात दिली. त्याच वेळी मी सभागृहास या पत्राबाबत सत्यता आढळली तर एकनाथ शिंदे यांची सुरक्षा वाढविण्यात येईल असं स्पष्ट केलं हाेतं.

त्यानंतर मी गृह खात्याची बैठक बाेलावली. ज्या दिवशी ही बैठक हाेती. त्याच दिवशी सकाळी मला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दूरध्वनी आला. त्यावेळी माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मला तुम्हांला अशा प्रकारे सुरक्षा वाढ करता येणार नाही असं सांगितलं. तरी देखील मी बैठक घेऊन त्यावर सर्व अधिका-यांचे म्हणणे समजून घेतले. त्यानंतर एकनाथ शिंदे व त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला. त्यानंतर सरकार पायउतार हाेईपर्यंत त्यास मान्यता दिली गेली नाही असंही आमदार देसाईंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा घात की अपघात?'६ जणांचा मृत्यू,मग प्रत्यक्षात ५ बॉडीच का?' आमदाराच्या मनात शंकांचं काहूर

लग्नाच्या पहिल्या रात्री चुकूनही या ५ गोष्टी करू नका; अन्यथा...

कमळ-धनुष्यबाणालाचा निधी मिळणार; मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य, VIDEO

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत शिवसेनेला खिंडार, बड्या नेत्याचा पक्षाला 'जय महाराष्ट्र '

पैसे सुट्टे देणे-घेण्यावरून वाद टोकाला गेला; ग्राहक आणि रिक्षाचालकामध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO

SCROLL FOR NEXT