थांबा ! वाघ येताेय..; एन्ट्रीच अशी की महामार्गावरील वाहतूकच थांबली (व्हिडीओ पाहा)

वनविभागाच्या कृतीमुळे प्राणी मित्रांनी पथकाचे काैतुक केले.
tiger, chandrapur , vehicles stops , forest department
tiger, chandrapur , vehicles stops , forest departmentsaam tv

चंद्रपूर : लहान मुलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर काही वेळा वाहनांना थांबविण्यात येते असे चित्र आपण अनेकदा पाहिलं असेल. पण एखाद्या प्राण्यासाठी वाहतुक ती ही महामार्गावरील (highway) थांबविल्याचे कधी कानावर आले हाेते का ? हाेय एका वाघासाठी (tiger) चक्क महामार्गावरील वाहतुक थांबविण्यात आली हाेती. ही घटना दाेन दिवसांपुर्वी चंद्रपूर (chandrpaur) जिल्ह्यात घडली आहे. (chandrapur latest marathi news)

नागभीड-ब्रम्हपुरी महामार्गावरील सायगाटा येथे दोन दिवसांपूर्वी दुपारी एक वाघ रस्त्याच्या शेजारी बसला होता. रस्त्यावरील भरधाव आणि अवजड वाहतुकीमुळे वाघाला रस्ता ओलांडताना अडचण निर्माण झाली हाेती. याबाबतची माहिती घटनास्थळावरुन काहींनी वनपथकास दिली. ही माहिती समजताच पथकाने महामार्गावर धाव घेतली.

tiger, chandrapur , vehicles stops , forest department
World Athletics Championship 2022 : नीरज पाठोपाठ भालाफेकीत रोहित यादव चमकला; सहा खेळाडू अंतिम फेरीत

घटनास्थळी वनविभागाचे पथक दाखल झाले. या पथकाने दाेन्ही बाजूची वाहतूक थांबवून वाघोबाला जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला. दोन्ही बाजूची वाहतूक थांबल्याने वाघोबाने माेठ्या दिमाखात रस्ता ओलांडला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. हा क्षण काहींनी आपल्या माेबाईलमध्ये चित्रीत केला.

Edited By : Siddharth Latkar

tiger, chandrapur , vehicles stops , forest department
Satara : नरबळी प्रकरण; भाेंदूबाबांच्या टाेळीस चाप लावा : अंनिसची मागणी
tiger, chandrapur , vehicles stops , forest department
'कोई नही है टक्कर में, क्यू पडेहो चक्कर में'; अविनाश साबळेसह माेदींच्या राष्ट्रकुलसाठी खेळाडूंना शुभेच्छा
tiger, chandrapur , vehicles stops , forest department
Karnataka : पत्नीस उत्पन्नाचे साधन समजणे ही क्रूरता : कर्नाटक उच्च न्यायालय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com