Mla Shahaji Patil Saam tv
महाराष्ट्र

Shahaji Bapu Patil : आमदार शहाजी पाटील पॅनेलचा धुव्वा, सूतगिरणी निवडणुकीत शेकापची बाजी

या निवडणूकीच्या निकाला नंतर शेकाप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली.

भारत नागणे

Pandharpur News :

सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील (shahaji bapu patil latest marathi news) यांना महिला सूतगिरणीच्या निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसला आहे. सूतगिरणीच्या सर्व 21 जागांवर शेकापचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख (dr babasaheb deshmukh) यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. (Maharashtra News)

सांगोल्यात शेकाप आणि आमदार पाटील गट हे पारंपरिक विरोधक आहेत. विधानसभे पूर्वीच शेकाप कार्यकर्त्यांनी आमदार शहाजी बापू पाटील गटाला सूतगिरणीच्या निवडणुकीत व्हाइट वॉश दिला आहे. महिला सूतगिरणी निवडणुकीत शेकापच्या सर्व २१ जागांवर महिला उमेदवार विजयी झाले आहेत.

या निवडणूकीच्या निकाला नंतर शेकाप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत बाबासाहेब देशमुख यांची मिरवणूक काढली. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आमदार शहाजी पाटील यांच्या पॅनलचा धुव्वा करुन शेकाप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

SCROLL FOR NEXT