Prithviraj Chavan : 'स्वार्थापाेटी फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचारांशी आपल्याच माणसांनी प्रतरणा केली', जयंत पाटलांच्या उपस्थितीत पृथ्वीराज चव्हाणांचा नेमका राेख काेणाकडे?

ज्या व्यवस्थेमुळे बहुजन समाज खितपत पडला तीच व्यवस्था पुन्हा येईल अशी शक्यता आमदार पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली.
Prithviraj Chavan
Prithviraj Chavansaam tv

Sangli News :

पतंगराव कदम (patangrao kadam jayanti) यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. दोघांनी मिळून एकच वेळी राज्यात 5 हजार साखळी बंधा-यांचे उद्घाटन केले. हे रेकॉर्ड झाले. चिकाटीने शासकीय काम करण्याचा हातखंडा पंतगराव यांचा होता आणि आपण असा हातखंडा आपल्या आयुष्यात पहिला नाही. दरम्यान शाहु, फुले, आंबेडकर आणि छत्रपतींच्या विचारातुन निर्माण झालेल्या व्यवस्थेतुन निर्माण झालेली माणस विचारांशी प्रतारणा करत आहेत असेही आमदार पृथ्वीराज चव्हाण (mla prithviraj chavan) यांनी नमूद केले. (Maharashtra News)

(कै.) डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त कडेगाव तालुक्यातील वांगी येथील स्मृतिस्थळी आज (मंगळवार) विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आठवणीतले डॉ. पतंगराव कदम या विशेष व्याख्यानाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या कार्यक्रमास काँग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (sushilkumar shinde), माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (mla prithviraj chavan), राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (ncp leader jayant patil), माजी आमदार मोहनराव कदम, माजी मंत्री विश्वजित कदम (vishwajeet kadam) आदी मान्यवरांची उपस्थिती हाेती.

Prithviraj Chavan
Kolhapur News : पावनगडावरील अनधिकृत मदरसा हटवला, विद्यार्थ्यांचे शिराेलीत स्थलांतर

आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आज विचार राहिला नाही. शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील ,पतंगराव कदम यांच्या विचारांची ही माती आहे. या मातीतील विचार घेऊन याच भूमीतुन लढावे लागेल. आजची लढाई आपण जिंकली नाही तर समाजकारण बदलून जाईल अशी भीती चव्हाण यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले व्यवस्था बदलण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. बहुजन समाज खितपत पडला आहे. ती व्यवस्था पुन्हा येईल. शाहु, फुले, आंबेडकर आणि छत्रपतींच्या विचारातुन निर्माण झालेल्या व्यवस्थेतुन निर्माण झालेली माणस विचारांशी प्रतारणा करत आहेत.

पृथ्वीराज चव्हाण यांचा राेख काेणाकडे ?

आपल्यातलीच काही माणसं स्वार्थापाेटी विचारांशी प्रतारणा करत आहेत असेही आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काेणाचेही नाव घेता टीका केली. दरम्यान 2 हजार वर्षांपूर्वी जी गुलामगिरी होती. ती गुलामगिरी करण्याची वेळ येईल असेही आमदार चव्हाण यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Prithviraj Chavan
Sambhajiraje Chhatrapati On Lok Sabha Election 2024 : संभाजीराजे छत्रपतींनी लाेकसभेसाठी ठाेकला शड्डू, जाणून घ्या 'स्वराज्य'चे मतदारसंघ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com