Sambhajiraje Chhatrapati On Lok Sabha Election 2024 : संभाजीराजे छत्रपतींनी लाेकसभेसाठी ठाेकला शड्डू, जाणून घ्या 'स्वराज्य'चे मतदारसंघ

मी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा समाजाला कसे आरक्षण दिले जाऊ शकतो याबाबतीत अनेक वेळा भूमिका मांडली आहे असे राजेंनी नमूद केले.
sambhajiraje chhatrapati to contest lok sabha election 2024
sambhajiraje chhatrapati to contest lok sabha election 2024saam tv

- रणजीत माजगाकर

Kolhapur News :

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje chhatrapati latest marathi news) यांनी आज (शनिवार) लोकसभा निवडणूक लढविण्याबाबतचे (lok sabha election 2024) संकेत काेल्हापूरात दिले. कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर की अन्य कुठून निवडणूक लढवणार ते लवकरच समजेल असेही राजेंनी माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले. (Maharashtra News)

संभाजीराजे म्हणाले स्वराज्य संघटना (swarajya sanghatana) मुख्य प्रवाहात राहणार. पूर्वी आम्ही विधानसभेवर लक्ष केंद्रीत केले हाेते. लोकसभेबाबत अनेकांची इच्छा आहे. लाेकसभेच्या दृ्ष्टीकाेनातून प्रवाहात राहू. सध्या तरी स्वराज्य जनतेचे प्रश्न जाणून घेत आहे.

sambhajiraje chhatrapati to contest lok sabha election 2024
Kolhapur News : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयास दीपक केसरकरांचा विराेध? भाजप जैन सेलचा दावा

तुम्ही काेल्हापूरात निवडणुक लढविणार, त्याबाबत महाविकास आघाडीशी चर्चा सुरु असल्याचे बाेलले जात आहे या प्रश्नावर राजेंनी चर्चा सुरु आहे तर चांगलं आहे. काेणत्या मतदारसंघातून लढणार हे निश्चित नाही. ते वेळ सांगेल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काेल्हापूर, नाशिक, संभाजीनगर की पुणे महाराष्ट्रातून स्वराज्य लढणार हे लवकरच समजेल असेही संभाजीराजे छत्रपती यांनी नमूद केले. थांबा आणि पाहा असेही राजेंनी म्हटले.

Edited By : Siddharth Latkar

sambhajiraje chhatrapati to contest lok sabha election 2024
MNS Protest against Jitendra Awhad : श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना मनसे धडा शिकवणार, जितेंद्र आव्हाडांवर अंधेरीत गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com