Shahaji bapu patil at dasara melava saam tv
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंना सांगा इकडे या, आणि....; मग समजेल खरी शिवसेना कुणाची, शहाजीबापू पाटील कडाडले

महाराष्ट्राची खरी शिवसेना कुणाची, याचा दाखला आता द्यावा लागणार, शहाजीबापू पाटील म्हणाले...

नरेश शेंडे

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय संघर्ष सुरु आहे. शिवसेना नेमकी कुणाची? हा तिढा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाचा आज दसरा मेळाव्याच्या निमित्तान ठाकरे गट आणि शिंदे गटाची तोफ धडाडली.

गेल्या काही दिवसांपासून लाखोंच्या संख्येत कार्यकर्त्यांची गर्दी जमवण्यासाठी दोन्ही गटांनी जय्यत तयारी केली. महाराष्ट्राची खरी शिवसेना कुणाची, याचा दाखला आता द्यावा लागणार आहे. उद्धव ठाकरेंना सांगा इकडे या आणि ही गर्दी बघा. त्यानंतर ठरवा ही शिवसेना कुणाची आहे, असा हल्लाबोल शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

आज गद्दारी म्हणतात. महाराष्ट्राने त्यावेळी तुम्हाला शाबासकी दिली, असं तुम्हाला समजायचंय का? भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तुम्ही युती तोडली आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले आणि आम्हाला गद्दार म्हणतात. अडीच वर्षात तुम्ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांचं खच्चीकरण केलं.

राष्ट्रवादीने गेल्या अडीच वर्षात आम्हाल उकीरड्यावर फेकलं. हे पाप उद्धव साहेब तुम्ही केलं. हे पाप धुवण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. एकनाथ शिंदे जिंदाबाद, एकनाथ शिंदे आगे बढो, हम तुम्हारे साथ है, तळागाळातील कार्यकर्त्यांचा हुंकार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Surve: मराठमोळी अभिनेत्री शिवानी सुर्वेचं वय किती?

Satara Doctor Case: सातारा डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई, PSI गोपाल बदने पोलिस खात्यातून बडतर्फ

Haldi Rituals: लग्नाच्या आधी हळदीचा विधी का करावा, जाणून घ्या कारण

मानलं राव! शेतकऱ्यांच्या लेकींच्या मदतीसाठी दिग्दर्शक प्रवीण तरडे सरसावले; शिक्षणासाठी 11 लाखांची मदत

लग्नानंतर स्तनांचा आकार खरोखर वाढतो? नेमकं कारण काय? तज्ज्ञांनी दिली खरी माहिती

SCROLL FOR NEXT