शिंदे गटाच्या मेळाव्याला जाणाऱ्या कार्यकर्त्यावर काळाचा घाला; वाटेतच अचानक आला ह्रदयविकाराचा झटका

मुंबईला शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी गेलेल्या शिवसैनिकाचा मृत्यू झाला आहे
eknath shinde supporter
eknath shinde supportersaam tv
Published On

संजय राठोड

Dasara Melava News : शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडल्यामुळे पक्षात दोन गट पडले आहेत. त्यामुळे दोन्ही गटाने मुंबईत दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. दोन्ही गटाचे समर्थक मोठ्या संख्येने दसरा मेळाव्यासाठी निघाले आहेत. याचदरम्यान, मुंबईला (Mumbai) शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी गेलेल्या शिवसैनिकाचा मृत्यू झाला आहे. शिवसैनिकाच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

eknath shinde supporter
Eknath Shinde Tweet : "मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे...", एकनाथ शिंदेंचं ट्वीट चर्चेत

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी गेलेल्या शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. श्रीकृष्णा मांजरे असं मृतक कार्यकर्त्याचं नाव आहे. मृतक श्रीकृष्णा हा मंत्री संजय राठोड यांचा समर्थक आहे. मृतक यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील हरसुलचा रहिवाशी आहे.

भिवंडीजवळ शिवशांती लॉन येथे नाश्टा करायला उतरला, त्यावेळी अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे इतर कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने टेंभी नाका येथील सिटी हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

eknath shinde supporter
'बाळासाहेब असते तर त्याना लाथ मारून बाहेर काढलं असतं'; सेना नेत्याची शिंदे गटावर जोरदार टीका

शिंदे गटाच्या बंडाळीनंतर राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे. शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेवर मोठं पक्षसंकट उभं ठाकलं आहे. तर संकटावर मात करण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाने शक्तीप्रदर्शन करण्यासाठी दसरा मेळाव्याचे भवदिव्य आयोजन केले आहे.

दोन्ही गटाने मेळाव्याला गर्दी जमविण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. राज्यभरातून कार्यकर्ते येत आहेत. याचप्रकारे यवतमाळवरून मुंबईत दसऱ्याला येणाऱ्या कार्यकर्त्यावर काळाने घाला घातला आहे. या शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com