Uddhav Thackeray News, Ravi Rana News,  Saam Tv
महाराष्ट्र

पोलिसांच्या नोटिशीनंतर रवी राणांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

येत्या ८ जूनला पुन्हा चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

अमरावती: आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. राणा दाम्पत्यांना आज मुंबई पोलिसांनी नोटीस पाठली आहे. येत्या ८ जूनला पुन्हा चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावरुन आता आरोप प्रत्यारेप सुरू झाले आहेत. आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आरोप केले आहेत. पोलिसांचा वापर करुन आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करत असल्याचा आरोप राणा यांनी केला आहे. (Ravi Rana News)

काही दिवसापूर्वी राणा दाम्पत्यांनी मातोश्री समोर हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याचा इशारा दिला होता. यावरुन मुंबईत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलीस (Police) राणा दाम्पत्याच्या मुंबईतील घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्या संबंधित ही नोटीस मुंबई पोलिसांनी त्यांना बजावली आहे.

या नोटीसवरुन आमदार रवी राणा यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले आहेत. मला राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा वापर करत आहेत, असा आरोप रवी राणा (Ravi Rana) यांनी केला आहे.

'कुठल्या ना कुठल्या पद्धतीने माझ्यावर दबाव आणून, महाविकास आघाडीला मी मतदान करावे म्हणून माझ्यावर नोटीसच्या माध्यमातून दबाव टाकला जात आहे. माझ्या अपक्ष आमदारांसोबत होत असलेल्या भेटी थांबण्यासाठी दबाव आणला जात आहे, असंही रवी राणा म्हणाले. मी कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. शिवसेनेचा उमेदवार पराभूत होईल आणि भाजपचा (BJP) उमेदवार निवडून येईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्वासही रवी राणा (Ravi Rana) यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulgule Recipe: नाश्त्याला काय करायचं सूचत नाही? ही गोड गुलगुल्यांची झटपट रेसिपी ट्राय करा

प्रेमाला विरोध, प्रेमी युगुलाचा टोकाचा निर्णय; गळफास घेत दोघांनी आयुष्य संपवलं

Tea Addiction: दुधाचा चहा पिताय? सावधान! शरीरावर होईल गंभीर परिणाम

Maharashtra Live News Update : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 192 कोटी जमा

Leopard Attack : बिबट्यानं आधी हल्ला केला, मग फरफटत नेलं, वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूनं हळहळ

SCROLL FOR NEXT