मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीआधी अपक्ष आमदारांना फडणवीसांचे फोन

देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष आमदारांना फोन केल्याची माहिती माहिती सूत्रांची माहिती आहे.
Devendra Fadnavis News, Uddhav Thackeray News
Devendra Fadnavis News, Uddhav Thackeray NewsSaam Tv
Published On

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या(Rajya Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यसभेची सहावी जागा जिंकण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह (Shivsena) विरोधकांनी आपली ताकद लावून दिली आहे. आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शिवसेना आमदारांसह अपक्ष आमदारांना बॅगा भरा अन् मुंबईत या असे आदेश दिले होते. असं असतानाच, दुसरीकडे विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अपक्ष आमदारांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Rajya Sabha Election 2022 Latest News)

Devendra Fadnavis News, Uddhav Thackeray News
Rajya Sabha Election : बॅगा भरा अन् मुंबईत या; शिवसेना आमदारांना मुख्यमंत्र्यांचे आदेश

राज्यसभेत ठाकरे सरकारला पाठींबा देण्यासाठी तयार असलेले अपक्ष आमदार देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. राज्यसभा निवडणुकीला आता फक्त 4 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आमदार फूटू नयेत म्हणून शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अपक्ष आमदारांना मुंबईत बोलावले आहे. सरकारमधील प्रमुख मंत्र्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या आमदारांसोबत वर्षा निवास्थानी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. मात्र त्याअगोदरच देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष आमदारांना फोन केल्याची माहिती आहे.

Devendra Fadnavis News, Uddhav Thackeray News
राणा दाम्पत्याच्या अडचणी पुन्हा वाढणार?; मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस

दरम्यान, शिवसेना बरोबरच काँग्रेसनेही आपल्या आमदारांना बॅगा घेऊन मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व आमदारांची एका बड्या हॉटेलात राहण्याची व्यवस्था केली जाणार असून त्यांना कुणालाही संपर्क करू दिला जाणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेनं सहावा उमेदवार दिल्यानंतर भाजपने सुद्धा सातवा उमेदवार देत शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मुळात शिवसेना आणि भाजप यांच्याकडे सहाव्या जागेसाठी पुरेसं मतदान नसल्याने आता दोन्ही पक्षाच्या विजयाची मदार अपक्ष आमदारांवर असणार आहे. (Devendra Fadnavis News)

येत्या 10 जूनला राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक बिनविरोध होणार नसल्यामुळे राज्यसभेसाठी सत्ताधारी तसेच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यसभेच्या 6 पैकी 5 जागांवर संबधित पक्षाचे उमेदवार सहजपणे निवडूण येतील. मात्र सहाव्या जागेसाठी चांगलीच चूरस होणार आहे.

विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे शिवसेना 55, राष्ट्रवादी 53 आणि काँग्रेस 44 अशी महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षांची 152 मते आहेत. भाजपचे 106 आमदार आहेत. अपक्ष आणि छोट्या पक्षांचे 29 आमदार आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com