Rajya Sabha Election : बॅगा भरा अन् मुंबईत या; शिवसेना आमदारांना मुख्यमंत्र्यांचे आदेश

राज्यसभा निवडणुकीला आता फक्त 4 दिवस शिल्लक आहेत.
Uddhav Thakeray News, Rajya Sabha Election 2022 News
Uddhav Thakeray News, Rajya Sabha Election 2022 NewsSaam Tv
Published On

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून (Shivsena) जोरदार तयारी करण्यात आली आहे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi) मंत्र्यांसोबत बैठका घेत आहेत. तर दुसरीकडे सर्व आमदारांना बॅंगा भरा अन् मुंबईत या असे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईमधील एकाच हॉटेलमध्ये सर्व शिवसेनाआमदारांची सोय करण्यात आली आहे. राज्यसभा निवडणुकीला आता फक्त 4 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आमदार फूटू नयेत म्हणून शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. (Rajya Sabha Election 2022 Latest News)

Uddhav Thakeray News, Rajya Sabha Election 2022 News
Norovirus : कोरोनानंतर आता नोरोव्हायरचं संकट; केरळात २ मुलांना संसर्ग, ही आहेत लक्षणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांसह सर्व अपक्ष आमदारांना आजच मुंबईत बॅगा भरून येण्यास सांगितलं आहे. चार ते पाच दिवस पुरेल एवढे कपडे घेऊन या, असा आदेशच मुख्यमंत्र्यांकडून या आमदारांना देण्यात आला असल्याची माहिती आहे. निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये, अमिषांना बळी पडून हे आमदार भाजपच्या गळाला लागू नयेत म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.

विशेष म्हणजे काँग्रेसनेही आपल्या आमदारांना बॅगा घेऊन मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व आमदारांची एका बड्या हॉटेलात राहण्याची व्यवस्था केली जाणार असून त्यांना कुणालाही संपर्क करू दिला जाणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेनं सहावा उमेदवार दिल्यानंतर भाजपने सुद्धा सातवा उमेदवार देत शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मुळात शिवसेना आणि भाजप यांच्याकडे सहाव्या जागेसाठी पुरेसं मतदान नसल्याने आता दोन्ही पक्षाच्या विजयाची मदार अपक्ष आमदारांवर असणार आहे.

Uddhav Thakeray News, Rajya Sabha Election 2022 News
Corona Update in India: देशात कोरोनाचा आलेख वाढताच; पाहा ताजी आकडेवारी

दुसरीकडे अपक्ष आमदार कुणाच्याही बंधनात नाहीये. त्यामुळे त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू करण्यात येत आहे. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांसह इतर अपक्ष आमदारांना बॅगा भरा आणि आजच मुंबईत या असे आदेश दिल्याची माहिती आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. म्हणून या आमदारांना मुंबईत बोलावलं असून त्यांना आजच हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com