Corona Update in India: देशात कोरोनाचा आलेख वाढताच; पाहा ताजी आकडेवारी

सध्या देशात कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या २५,७८२ आहे.
Corona Update
Corona UpdateSaam TV
Published On

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जून महिना सुरू होताच कोरोनाबाधितांची संख्या ४ हजारांच्या पुढे गेली आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४५१८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर याच कालावधीत ९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे रविवारी सुद्धा देशात कोरोनाचे ४ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले होते. (Corona Virus Latest Update in India)

Corona Update
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; राज्यातील शाळा पुन्हा बंद होणार?, वर्षा गायकवाड म्हणाल्या....

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे तब्बल ४ हजार ५१८ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४३,१८१.३३५ इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत ४२,६३०,८५२ लोकांनी कोरोना व्हायरसवर मात केली आहे. या प्राणघातक विषाणूमुळे देशात एकूण ५२४,७०१ लोकांचा मृत्यू झाला आहे.

सध्या देशात कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या २५,७८२ आहे. तर गेल्या २४ तासांत २,७७९ लोक कोरोना व्हायरसने बरे झाले आहेत. दरम्यान, देशात कोरोना रुग्णांच्या बाबतीत अव्वल ठरलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा संसर्गाचा वेग वाढला आहे.

राज्यात शनिवारी १३५७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ५९५ रुग्ण बरे झाले असून एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. सध्या ५८८८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. करोनाचा वाढता प्रसार पाहता राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

कोर्बेव्हॅक्स बूस्टर डोस मंजूर

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने CORBEVAX लसीला कोरोना बूस्टर डोस म्हणून मान्यता दिली आहे. १८ वर्षांवरील लोक ज्यांनी कोव्हिशिल्ड (CovaShield ) किंवा कोवॅक्सिन (Covaxin) चे दोन्ही डोस घेतले आहेत ते आता आपत्कालीन परिस्थितीत बूस्टर डोस म्हणून कोर्बेव्हॅक्स( CORBEVAX) घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com