कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; राज्यातील शाळा पुन्हा बंद होणार?, वर्षा गायकवाड म्हणाल्या....

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढतच चालले आहे.
Varsha Gaikwad
Varsha GaikwadSaamTV
Published On

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून देशासह महाराष्ट्रात कोरोना (Corona) रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढतच चालले आहे. कोरोनाच्या या वाढत्या रुग्ण परिस्थितीवर राज्यातील शाळा (School and colleges) सुरू होणार की पुन्हा बंद होणार का? शाळा बंद झाल्यात तर विद्दयार्थ्यांचं शिक्षण कसं होणार? याबाबत पालकांसह विद्यार्थ्यांना प्रश्न पडले आहेत. यावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharastra Corona Updates)

Varsha Gaikwad
चार आणे , राणे फाणे यांनी अजून पूर्ण शिवसेना बघितली नाही : अब्दुल सत्तार

दरम्यान, शाळा 13 जूनपासूनच सुरु होणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली. कोरोना रुग्णांची गेल्या काही दिवसात मुंबईत लक्षणीय वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मास्क वापरण्याचं आवाहन पुन्हा केलं आहे. राज्यात सध्यातरी मास्क सक्ती करण्यात आलेली नसली, तर सगळ्यांनी खबरदारी बाळगावी, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

राज्यात येत्या 13 जूनपासून शाळा सुरु होणार असून वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शाळांसाठी नवी नियमावली जारी करण्यात येणार आहे. तसे निर्देश शिक्षण खात्याकडून लवकरच शाळांना देण्यात येणार आहेत. "कोरोनाची ही वाढती आकडेवारी बघून लगेच शाळा बंद करणं योग्य ठरणार नाही, आम्ही सर्व शाळांना कोरोनाचे सर्व नियम पाळूनच घेण्यास सूचना दिल्या आहेत. तसंच प्रत्येक शाळेमध्ये कोरोनाचा शिरकाव होणार नाही यासाठी नियम पाळण्यास सांगितलं आहे. राज्यात मास्क सक्ती जरी नसली तरी शाळेत विद्यार्थ्यांनी किंवा बाहेरही सर्वांनी मास्क घालणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच मास्कबाबत जनजागृती करणं आवश्यक आहे." असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, राज्यासह मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढताच आहे. रविवारी मुंबईमध्ये कोरोनाचे 961 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 374 बरे झालेत. मुंबई रविवारी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जवळपास हजार रुग्णांची भर पडल्यानं आता पुन्हा एकदा मुंबईतील पालिका प्रशासन सतर्क झालंय. मुंबईसोबत ठाणे, नवी मुंबई, वसई विरार या आजूबाजूच्या क्षेत्रातही रुग्णवाढीची भीती असल्याचं खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं जात आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com