चार आणे , राणे फाणे यांनी अजून पूर्ण शिवसेना बघितली नाही : अब्दुल सत्तार

शिवसेना नेते, मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
Abdul Sattar
Abdul Sattar Saam TV
Published On

जालना : शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे.भाजप नेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यासहित अनेक राजकीय मुद्यावरून शिवसेनेवर हल्लाबोल केला जात आहे. शिवसेनेकडूनही भाजपच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं जात आहे. दरम्यान, शिवसेना नेते, मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. चार आणे , राणे फाणे यांनी अजून पूर्ण शिवसेना बघितली नाही, अशा शब्दात मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. ( Maharashtra Politics News In Marathi )

हे देखील पाहा -

जालन्यात शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. अब्दुल सत्तार म्हणाले, 'अर्जुन खोतकरांचं राजकीय अस्तित्व मिटवण्याचं काम भाजपकडून करण्यात आलं. मात्र, ते पूर्णपणे बाहेर आले. आता २०२४ मध्ये त्यांना हिशोब द्यावा लागेल. हे चार आणे, राणे फाणे यांनी अजून पूर्णपणे शिवसेना बघितली नाही, अशा शब्दात मंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली.

Abdul Sattar
Pune : वारी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार; अजित पवार म्हणाले...

या मेळाव्यात सत्तार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावरही निशाणा साधला. सत्तार म्हणाले, रावसाहेब हे दानवे नाही तर दानव आहेत,अशी टीका सत्तार यांनी केली. दरम्यान, केंद्रीय यंत्रणाच्या कारवाईनंतर महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांना तुरुंगात जावं लागलं आहे. तर अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीच्या धाडी पडल्या आहेत. मात्र, या धाडी भाजप सरकारच्या इशाऱ्यानंतर पडल्याचा आरोप महाविकास आघाडीतून करण्यात येत आहे.या ईडीच्या धाडीवरूनही मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.'भाजप नेत्यांची चौकशी केली तर सरकारला नवीन जेल उभारावं लागेल, असा टोला सत्तार यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com