पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुण्याच्या देहूमध्ये १४ जून रोजी येणार आहेत. संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे अन् शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या पुणे(pune) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना अजित पवारांनी आगामी आषाढी वारी नियोजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्याविषयी वारकऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) माध्यमांशी संवाद साधला. वारी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. पंतप्रधानांचं स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे, असे वक्तव्य अजित पवारांनी यावेळी केले. ( Ajit Pawar News In Marathi )
हे देखील पाहा -
अजित पवार म्हणाले, 'आषाढी वारी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. पंतप्रधानांचं स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करायला मी जाणार आहे. दोन वर्षांनंतर वारी होत आहे. माझी परमेश्वराला प्रार्थना आहे की, यंदाची वारी सुखरुप होऊ दे'.
अजित पवारांनी पालखी नियोजनाबद्दल माहिती जाणून घेतली. 'या वारीतील पालखी नियोजन देखील व्यवस्थित केलं आहे. तब्बल दोन वर्षानंतर वारी होत आहे. यंदाच्या वारीत १५ लाख वारकरी सहभागी होतील, असंही अजित पवारांनी सांगितलं. यावेळी त्यांनी वारीवर येणाऱ्या कोरोना संकटावरही भाष्य केलं आहे. 'लोकांना मास्क लावा असं आवाहन करायला काय हरकत आहे. आमच्या टास्क फोर्सनं सांगितलं तरच आम्ही मास्क सक्ती करणार. तसेच ज्यांना वारीत लसीकरण करायचं आहे त्यांना लस देणार. ज्यांना बूस्टर डोस हवा आहे, त्यांना बूस्टर डोस देण्यात येईल. वारीत कोरोना नियंत्रित करणं कठीण आहे,असंही अजित पवारांनी सांगितलं.
Edited By - Vishal Gangurde
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.