mahesh shinde, sharad pawar, baramati, koregoan
mahesh shinde, sharad pawar, baramati, koregoan saam tv
महाराष्ट्र

Satara : 'बारामतीकरांचे राज्य आता संपलं आहे, हे ध्यानात घ्या अन् नीट वागा'

Siddharth Latkar

सातारा : ऊसाची आडवा आडवी जिरवा जिरवी करू नका, आता एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचे सामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे (farmer), बळीराजाचे राज्य आले आहे असे आमदार महेश शिंदे (mahesh shinde) यांनी नमूद केले. दरम्यान आता बारामतीकरांचे राज्य संपलं आहे अशी टिप्पणीही आमदार महेश शिंदे यांनी करत हे ध्यानात घ्या आणि नीट वागा असा इशारा राष्ट्रवादी काॅंग्रसेला दिला आहे. (mahesh shinde latest marathi news)

तडवळे (ता. काेरेगाव) येथील एका कार्यक्रमात आमदार महेश शिंदे बाेलत हाेते. ते म्हणाले आमची काय ताकद आहे हे दाखवून दिलं आहे. त्यांच्या मालकाला पण धाेबीपछाड दिलं. दिवसा चांदण्या दाखवल्या. आमच्या नादाला लागला तर आम्ही किती बाद करु शकताे हे दाखवायचे काम आम्ही महाराष्ट्रास दाखविलं आहे.

काहीजण म्हणत आहेत आमदार महेश शिंदे याला पाडणार. हा हक्क तुम्ही कधीच गमावला आहे. खरंतर मी असला विचार कधीच करत नाही. जनताच तुम्हांला तुमची जागा दाखविणार आहे असा टाेला आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यावर केला.

त्यामुळे तुम्हांला मत मागण्याचा अधिकार राहिला नाही. सातारा जिल्ह्यात आता बारामतीकरांना स्थान नाही. आज राज्यात शेतक-यांचे राज्य आले आहे. शिंदेशाही- फडणवीसांचे राज्य आले असून सामान्य जनतेसाठी ते झटत आहेत असेही आमदार शिंदे यांनी नमूद केले. या कार्यक्रमास काेरेगाव नगरविकास आघाडीचे पदाधिकारी, आजी- माजी नगरसेक, नगरसेविका उपस्थित हाेते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Constable Death: चोरट्यांचा पाठलाग जीवघेणा ठरला; पाठीत विषारी इंजेक्शन खुपसलं, पोलीस जीवानिशी गेला

MS Dhoni- Daryl Mitchell: डॅरील मिचेलने धावत २ धावा पूर्ण केल्या, पण धोनीने स्ट्राईक सोडली नाही - Video

Ghati Hospital : घाटी रुग्णालयातील नर्सेसचे काम बंद; मनुष्यबळ वाढविण्याची मागणी 

Hingoli Krushi Utpanna Bazar Samiti : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! हिंगाेलीत आठवड्यातून पाच दिवस हळद खरेदी सुरू करणार

Gallbladder Stone : पित्त खड्यांमुळे होऊ शकतो कर्करोग; वेदना कायमच्या दूर करण्यासाठी ५ रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT