राज्यातील शेकापचे चिटणीस मंडळ बरखास्त; आमदार जयंत पाटलांची घोषणा Saam Tv
महाराष्ट्र

राज्यातील शेकापचे चिटणीस मंडळ बरखास्त; आमदार जयंत पाटलांची घोषणा

नवे चिटणीस मंडळ एका महिन्याच्या आत स्थापन करण्यात येणार

भारत नागणे

सांगोला - राज्यातील सांगोला Sangola तालुक्यातील वर्चस्व असणारा शेकाप पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील Jayant Patil यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवशी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे शेकापचे चिटणीस मंडळ बरखास्त करण्यात आले असून नवे चिटणीस मंडळ एका महिन्याच्या आत नव्याने स्थापन करण्यात येणार आहेत. अशी माहिती शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे.

हे देखील पहा -

राज्यातील शेकापचे चिटणीस मंडळ बरखास्त केल्याची जयंत पाटील यांनी जाहीर केले. दोन दिवसीय मध्यवर्ती समितीच्या बैठकीत एकूण सहा ठराव करण्यात आले आहेत. यामध्ये राज्यातील वीज ग्राहकांना सवलत द्यावी विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांची शासनाने 50 टक्के इतके आरक्षण जाहीर करावे.

राज्यात सुरू असलेल्या महिला अत्याचार यावर सरकारने दखल घ्यावी व त्यावरील कायदे आणि शिक्षा यांची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. कोल्हापूर राज्यातील पूरग्रस्त भागात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असे एकूण सहा विविध ठराव यावेळी करण्यात आले. राज्यात महाविकासआघाडीला पाठिंबा असला तरी सांगोला तालुक्यात मात्र महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होणार नसल्याचे ही जयंत पाटील यांनी सांगितले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : शिंदेंना टोकलं, ठाकरेंना पटलं; एकनाथ शिंदेंना 'गद्दार' म्हणत तरुणाची घोषणाबाजी VIDEO

Maharashtra Politics : मुंबईत राडा! ठाकरे-शिंदेंचे समर्थक आमनेसामने, दगडफेक अन् मारामारीमुळे वातावरण तापलं!

Assembly Election: सरकारची दोरी, शेतकऱ्यांच्या हाती; कांद्यापाठोपाठ सोयाबीन महायुतीला रडवणार?

Assembly Election: भाजपनं सोडली अमित ठाकरेंची साथ? सरवणकरांच्या रॅलीत कमळाचे झेंडे

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा जोरदार पाऊस! १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT