भाजप नेते गोत्यात? दिग्गजांचे कारखाने ब्लॅक लिस्टमध्ये

अनेक पुढाऱ्यांच्या करखान्यांचाही यामध्ये समावेश
भाजप नेते गोत्यात? दिग्गजांचे कारखाने ब्लॅक लिस्टमध्ये
भाजप नेते गोत्यात? दिग्गजांचे कारखाने ब्लॅक लिस्टमध्येSaam Tv
Published On

पुणे- इतिहासात पाहिलांदाच साखर कारखानदारीवर Sugar Factory जाहीर आणि ठोस भूमिका साखर आयुक्तलायकडून घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कारखान्यांची थेट यादी जाहीर करण्यात आली आहे. अशी यादी पाहिलांदाच साखर आयुक्तलायाकडून काढण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील एकूण 44 कारखाने हे ब्लॅक लिस्टमध्ये  Balck List म्हणजे एफआरपी FRP वेळेत न देणारे कारखाने म्हणून घोषित करण्यात आले आहे.

हे देखील पहा -

एवढ्यावरच साखर आयुक्त थांबले नसून शेतकऱ्यांनी ऊस कोणत्या कारखान्याला घालवावा हे शेतकऱ्यांनी ठरवावं असे आवाहन देखील केले आहे. महत्वाचे म्हणजे अनेक पुढाऱ्यांच्या करखान्यांचाही यामध्ये समावेश आहे. भाजप BJPनेत्या पंकजा मुंडे, सुभाष देशमुख, समाधान औताडे, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा या यादीमध्ये समावेश आहे.

भाजप नेते गोत्यात? दिग्गजांचे कारखाने ब्लॅक लिस्टमध्ये
RTI: लॉकडाउन दरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या आत्महत्येत 31 टक्के वाढ

राज्यातील ब्लॅक लिस्टमध्ये असलेले कारखाने

श्री दत्त इंडिया प्रा. ली. सांगली

यशवंत शुगर, खानापूर सांगली

एम. जी. झेड शुगर तासगाव सांगली

किसनविर साखर कारखाना, सातारा

खंडाळा तालुका कारखाना, सातारा

गुरू साखर कारखाना, कोरेगाव, सातारा

स्वराज इंडिया फलटण सातारा

ग्रीन पवार खटाव, सातारा

नीरा भीमा इंदापूर, पुणे

राजगड भोर, पुणे

सिध्येश्वर उत्तर सोलापूर

संत दामाजी सोलापूर

श्री विठ्ठल पंढरपूर सोलापूर

मकाई करमाळा, सोलापूर

संत कुर्मदास माढा सोलापूर

लोकमंगल ॲग्रो उत्तर सोलापूर

लोकमंगल शुगर दक्षिण सोलापूर

सिद्धनाथ शुगर उत्तर सोलापूर

गोकुळ शुगर दक्षिण सोलापूर

मातोश्री लक्ष्मी अक्कलकोट सोलापूर

जय हिंद शुगर दक्षिण सोलापूर

विठ्ठल शुगर करमाळा सोलापूर

गोकुळ माऊली शुगर अक्कलकोट सोलापूर

भीमा साखर मोहोळ सोलापूर

सहकार शिरोमणी वसंतराव काळे पंढरपूर सोलापूर

लोकमंगल माऊली उस्मानाबाद

भाऊसाहेब बिराजदार उस्मानाबाद

बानगंगा उस्मानाबाद

डी डी एन उस्मानाबाद

पियुष शुगरअहमदनगर

एस जे शुगर मालेगाव नाशिक

सातपुडा शुगर नंदुरबार

शरद साखर कारखाना पैठण औरंगाबाद

घुश्मेश्वर शुगर औरंगाबाद

संघननाथराव जालना

समृद्धी शुगर जालना

जयभावानी बीड

वैद्यनाथ परळी, बीड

टोकाई हिंगोली

सुभाष शुगर नांदेड

सिद्धी शुगर लातूर

साईबाबा शुगर लातूर

पन्नगेश्वर शुगर लातूर

ह्या कारखान्यांवर कारवाई जरी झाली असली तरी शेतकऱ्यांनी येणाऱ्या गळीत हंगामात कोणत्या कारखान्यास ऊस घालावा असा प्रश्न पडला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com