Balaji Kalyankar, Eknath Shinde, Maharashtra, Maharashtra Politics saam tv
महाराष्ट्र

व्हय की, ताेंड लपवणारा आमदार आपलाच ! एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ व्हायरल; गावात चर्चाच चर्चा

आज नांदेड शहरात शिवसैनिक एकटवले आहेत. त्यांनी आमदार बालाजी कल्याणकर यांचे छायाचित्र व नाव बॅनरवरुन वगळलं.

संतोष जोशी

नांदेड : शिवसेनेचे (shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी आपल्या सोबत असलेल्या आमदारांचे समर्थन असल्याचे दाखवत असताना शिंदे (eknath shinde latest marathi news) यांच्या सोबत असलेले नांदेड ऊत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar) हे इतर आमदारांच्या पाठीमागे जाऊन चेहरा लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत असा व्हिडीओ सध्या नांदेड जिल्ह्यात व्हायरल हाेत आहे. दरम्यान शिवसैनिकांनी नांदेड (nanded) शहरात आज 'साहेब आम्ही तुमच्या सोबत' अशा आशयचा बॅनर लावला असून त्यावर आमदार बालाजी कल्याणकर यांचे छायाचित्र व नाव देखील वगळण्यात आले आहे. (Maharashtra Politics Latest News)

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत असलेल्या आमदारांचे समर्थन असल्याचे दाखवत असताना शिंदे यांच्या सोबत असलेले नांदेड ऊत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर इतर आमदारांच्या पाठीमागे जाऊन चेहरा लपविण्याचा प्रयत्न करत आहेत. बाजुच्या आमदाराने कल्याणकर यांना समोर येण्यास सांगितले. तसेच यावेळी एकनाथ शिंदेंच्या विजयाच्या घोषणा उपस्थित आमदार देत होते. त्यावेळी कल्याणकर व्हिडीओत आपण दिसू नये याची काळजी घेत होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

कल्याणकर दोन दिवसांपासून नाॅटरिचेबल होते. ते मुंबई की सुरतमध्ये याचे तर्क लढवले जात असताना कल्याणकर शिंदें सोबत दिसून आले. एकनाथ शिंदे यांनी आपल्याला 40 आमदारांचा पाठींबा असल्याचा दावा करीत असतानाच कॅमेऱ्यात कैद होईल या भितीने कल्याणकर मागे जाताना दिसत आहेत. व्हिडीओत ते स्पष्ट दिसत आहे. मग कल्याणकर शरिराने शिंदे सोबत आहेत मात्र मनाने शिंदेंसोबत नाहीत असेच एकंदर त्यांच्या वर्तणुकीवरुन दिसत आहे.

mla balaji kalyankar hiding.

दरम्यान नांदेड शहरात आज शिवसेनेने ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. 'साहेब आम्ही तुमच्या सोबत' अशा पध्दतीचा बॅनरवर मजकुर छापण्यात आला आहे. बॅनरवर आमदार बालाजी कल्याणकर यांचा फोटो, नाव देखील दिसत नाही. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात शिवसेनेत अस्वस्थता पसरल्यान बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या तिघांचेच फोटो आहेत. बॅनरवर शिवसेनेचे दत्ता पाटील कोकाटे, आनंदराव बोंढारे आणि उमेश मुंडे अशा तिन्ही जिल्हा प्रमुखांची नावे आहेत. यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे यांनी नांदेडचे शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे म्हटले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

SCROLL FOR NEXT