सुरत : विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण (maharashtra politics) आज (मंगळवार) सकाळपासून ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे खंदे समर्थक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde latest updates) हे सेनेच्या (shivsena) सुमारे 17 आमदारांसह सूरतला (Eknath Shinde in Surat) गेल्याचे समजते. दरम्यान महाविकास आघाडी सरकार विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सावरेपर्यंत शिंदेंनी दूसरा धक्का दिल्याची चर्चा आहे. शिंदे हे गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील (Gujarat BJP chief C R Patil) यांच्याशी संपर्कात हाेते असेही समजते. (Eknath Shinde latest News)
शिंदे हे गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये तळ ठोकून असल्याचे समजते. हॉटेलमध्ये ते आहेत त्याच्या बाहेर मोठा पोलीस (police) बंदोबस्त लावण्यात आला आहे. अनधिकृत व्यक्तींच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमुळे उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते, असा दावा राजकीय वर्तुळातून केला जात आहे. एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि त्यांच्या समवेत असलेले अन्य आमदारांना गुजरात भाजपचे अध्यक्ष सी आर पाटील यांनी मदत केल्याची समजते. पाटील आणि शिंदे दे दाेघेही एकमेकांच्या संपर्कात असल्याचे समजते.
गुजरात भाजपचे अध्यक्ष सी आर पाटील हेच सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय घडामाेडींच्या पाठीशी असल्याचे समजते. पाटील हे मराठा समाजातील आहेत. त्यांचे जळगाव जिल्ह्याशी घट्ट नाते आहे. तसेच भाजपच्या केंद्रीय स्तरावर त्यांचे दाेन व्यक्तीशी निकटचे संबंध आहेत. दरम्यान पाटील हे सध्या गांधीनगरमध्ये आहे. त्यांनी आमदार सुरतला आल्याचे मला समजले असे एका वृत्तवाहिनीशी बाेलताना स्पष्ट केले. पाटील यांनी या विषयावर अधिक भाष्य करण्यास स्पष्ट नकार दिला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.