Devendra Fadnavis News, Eknath Khadse News, Maharashtra Political crisis News Updates
Devendra Fadnavis News, Eknath Khadse News, Maharashtra Political crisis News UpdatesSaam TV

राज्यात पुन्हा भाजप-शिवसेना सरकार येणार का?; एकनाथ शिंदेंनी ठेवला प्रस्ताव

राज्यात पुन्हा भाजप शिवसेना सरकार येणार?
Published on

मुंबई : आताच्या घडीची मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी पक्षासमोर एक मोठा प्रस्ताव ठेवला आहे. भाजपसोबत सरकार स्थापन करा आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा अशा स्वरूपाचा हा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युती होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. (Latest Politics News In Maharastra)

Devendra Fadnavis News, Eknath Khadse News, Maharashtra Political crisis News Updates
Shivsena Political Crisis: एकनाथ शिंदे यांची तयारी दोन वर्षांपासूनच

विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप येणार की काय? अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच नाराज एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला एक प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती आहे.(Maharashtra Political crisis News Updates)

Devendra Fadnavis News, Eknath Khadse News, Maharashtra Political crisis News Updates
मोठी बातमी: एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या शिवसेना आमदाराला हृदयविकाराचा झटका!

या प्रस्तावात शिवसेनेनं महाविकासआघाडी सरकारमधून बाहेर पडावं, भाजपसोबत युती करावी. तसेच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं. असं सांगण्यात आल्याची माहिती आहे. शिवसेनेचे काही नेते हा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर गेले असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता शिवसेना पुन्हा एकदा भाजप सोबत जाऊन राज्यात सरकार स्थापन करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

जर सरकार स्थापन झालं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. तर मग मागील अडीज वर्षांपासून दोन्ही पक्षात चाललेली लढाई का? अशीही चर्चा राज्यातील राजकीय वातावरणात रंगली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com