bhandra news Saam Tv
महाराष्ट्र

Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, माजी नगरसेवकास अटक

घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने माजी नगरसेवकाच्या घरातून पळ काढून आपबिती तिच्या कुटुंबियांना सांगितली.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Bhandara News : भंडारा जिल्ह्यात येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच झाली. त्यानंतर पीडितेने कुटुंबियांसमवेत गावातील पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिच्या बाबत घडलेला प्रकार पाेलिसांपुढे तिने कथन केला. पाेलिसांनी तिच्या तक्रारीनंतर माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल केला. पाेलिसांनी साम टीव्हीला दिलेल्या माहितीनूसार संशयितांस अटक करण्यात आली आहे (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार ही घटना स्वातंत्र्यदिनी दुपारी 12 च्या सुमारास घडली. पीडिता आपल्या मैत्रिणीसोबत भाजी आणण्याकरिता संशयिताच्या घरी गेली होती. तेव्हा त्याने मुलीला स्वयंपाकघरातून पिण्याचे पाणी आणण्यास सांगितले.

त्यावेळी घरी कुणीच नव्हते. ही संधी साधून संशयित पीडितेच्या मागोमाग गेला व त्याने बळजबरीने अश्लील चाळे केले. घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने पळ काढून आपबिती कुटुंबियांना सांगितली.

त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तत्काळ पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी कलम 354, 354 (अ) (1) तसेच (बाल. ले.अ. प्र. का. 2012 चे सहकलम 8, 12 नुसार) गुन्हा नोंद करून संबंधित माजी नगरसेवकास अटक केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narali Purnima : नारळी पौर्णिमेला ५ मिनिटात काय बनवाल? खोबऱ्याची करंजी की खोबऱ्याची बर्फी

Famous Youtuber Death: प्रसिद्ध युट्यूबरचा २३व्या वर्षी दुर्दैवी अंत; महाकालच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला, आईचाही मृत्यू

Korean Vs Japanese Skincare : कोरियन की जपानी? ग्लोईंग स्किनसाठी कोणती स्किनकेअर बेस्ट?

Kanda Express : कांदा एक्स्प्रेस लासलगाव येथे रोखली, VIDEO

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई, एमपीएससीच्या ३ अधिकाऱ्यांसह ६ जणांना अटक

SCROLL FOR NEXT