Hingoli Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Hingoli Crime News: अल्पवयीन मुलीच्या फोटोशी छेडछाड; अश्लील फोटो समाज माध्यमावर अपलोड करताच पुढे जे काही झालं...

Crime In Hingoli: या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

संदीप नागरे

Crime News: राज्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक यातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता हिंगोली येथून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

दोन आरोपींनी अल्पवयीन तरुणीच्या फोटोशी छेडछाड करून तिचे अश्लील बनवत फेसबुकवर अपलोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.  (Latest Marathi News)

सोशल मीडियावर (Social Media) वादग्रस्त पोस्ट टाकण्याच्या घटनेत गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे. पोलीस देखील अशा घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या विविध सोशल वेबसाईटवर लक्ष ठेवून आहेत. असे असले तरी देखील, सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांवर अत्याचार होणाऱ्या घटनांमध्ये वाढ सुरूच आहे.अशीच एक घटना हिंगोली मध्ये उघडकीस आली आहे.

हिंगोलीच्या (Hingoli) कळमनुरी तालुक्यातील शेनोडी गावात, मागील दहा दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीचा छळ करून अत्याचार सुरू होता. शेनवडी गावातील दोन आरोपी पीडित मुलीचा पाठलाग करत तिचे विविध फोटो काढून फेसबुक (Facebook) सारख्या सोशल साईटवर फोटोशी छेडछाड करून अपलोड करत तिचा विनयभंग करत होते. अखेर या प्रकरणी पीडित मुलीने हा संपूर्ण प्रकार तिच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आणून दिला. (Maharashtra News)

त्यानंतर कळमनुरी पोलिसात आरोपी कार्तिक आणि शिवाजी या दोन जणांविरोधात आयटीॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर हिंगोली पोलिसांनी जिल्हाभरातील महिला आणि मुलींना अशा प्रकारचे कृत्य घडत असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bomb Threat on Indigo Flight: विमानात मानवी बॉम्बची धमकी; ईमेल मिळताच इंडिगो फ्लाइटचं मुंबई एअरपोर्टवर आपत्कालीन लँडिंग

Maharashtra Live News Update : : पुण्याच्या दौंड शहरात दोन ठिकाणी दरोडा; मध्यरात्री दरोडेखोरांचा धुमाकूळ

सत्याचा मोर्चा निवडणूक आयोगानं गांभीर्यानं घ्यावा, राज ठाकरेंनी पुरावे दाखवल्यानंतर राज्याच्या मंत्र्यांचं विधान|VIDEO

Sunday Horoscope: आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा, रविवारचे राशिभविष्य

Devgad Tourism : समुद्रकिनारा अन् ऐतिहासिक किल्ला; देवगडला गेल्यावर 'हे' ठिकाण नक्की पाहा

SCROLL FOR NEXT