Good News: शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, मुंबईत 'बेस्ट' बसने करा मोफत प्रवास

Mumbai BEST bus free travel for school students: मुंबईतील शाळकरी मुलांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज मुंबई महानगर पालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा करण्यात आली. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना बेस्ट बस प्रवास मोफत करण्यात आला.

मुंबईतील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई महानगर पालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली. इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना बेस्ट बसने मोफत प्रवास करता येणार आहे. महानगर पालिका शाळेच्या गणवेशधारी विद्यार्थ्यांना शाळेत येण्या- जाण्यासाठी आता 'बेस्ट' बसचा मोफत प्रवास करता येणार आहे. ज्या भागात नियमित बस सेवा नाही, त्याठिकाणी पालिकेतर्फे विशेष बसेसची सोय केली जाईल. या योजनेसाठी मुंबई महानगर पालिकेने अर्थसंकल्पात तब्बल ८ कोटी ७० लाखांची तरतूद केली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com