Buldhana Farmer Unique Wedding: माणसाच्या लग्नात जनावरांची पंगत; शेतकाऱ्याने केला लेकीचा अनोखा विवाह, लग्नाची जिल्हाभर चर्चा

Farmer Unique Wedding Ceremony: बुलढाणा जिल्ह्यातील कोथळी या छोट्याशा गावातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या मुलीचा शाही विवाह केला. या विवाहाची सध्या जिल्हाभर जोरदार चर्चा सुरु आहे.
Unique Marriage
Unique Marriage Saam Tv

Buldhana Marriage News: बुलढाणा जिल्ह्यातील कोथळी या छोट्याशा गावातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या मुलीचा शाही विवाह केला. या विवाहाची सध्या जिल्हाभर जोरदार चर्चा सुरु आहे. याचे कारण म्हणजे या लग्नाला परिसरात असणाऱ्या पशु पक्षांनाही पंगत देण्यात आली. इतकच काय तर परिसरातील पाच गावातील दहा हजार लोकांना लग्नासाठी व जेवणासाठी निमंत्रणही देण्यात आल होत. (Latest Marathi News)

Unique Marriage
Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान पाठोपाठ आता 'नमो शेतकरी'चा हप्ता मिळणार

बुलढाणा (Buldhana) जिल्हातील कोथळी गावातील प्रकाश सरोदे या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या एकुलत्या एक कन्येचा थाटामाटात विवाह केला. आता तुम्ही म्हणाल यात नवल काय. तर या विवाह सोहळ्यासाठी गावालगत पाच एकर शेतात मंडप बांधण्यात आला होता.

गावाजवळील पाच गावातील सर्वांना या विवहाचे निमंत्रण देण्यात आले होता. जवळपास दहा हजार लोकांना जेवणही देण्यात आले. इतकच काय तर सरोदे यांनी परिसरातील गुरे, पशू पक्ष्याना ही जेवण देण्यात आलं. यासाठी गायींना दहा क्विंटल ढेप, गुरांना दहा ट्रॉली सुखा चारा, परिसरातील श्र्वानाना जेवण इतकंच काय तर परिसरातील मुंग्या ही उपाशी राहू नये म्हणून मुंग्यांना दोन पोते साखर टाकण्यात आली. (Buldhana News)

Unique Marriage
Parbhani News: येलदरी धरणात बुडून 16 वर्षीय मुलाचा मृत्यू; 2 दिवसांनी सापडला मृतदेह

प्रकाश सरोदे यांनी आपल्या लाडक्या कन्येचा विवाह भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या अतुल दिवाणे याच्याशी केला. अल्पभूधारक असूनही नातेवाईकांच्या मदतीने हा विवाह (Marriage) सोहळा परिसरातील सर्वांसाठी नेत्रदीपक ठरला.

विवाहात खर तर मुक्या प्रण्यांचीही काळजी घेण्यात आली, सर्वप्रथम गायीला पूजन करून परिसरात असणाऱ्या सर्व गायींना ढेप खाऊ घालण्यात आली त्यानंतर इतर सर्वांच्या गुरांना चारा, परिसरातील पक्षांना तांदूळ, श्र्वानांना जेवण देण्यात आलं तर आपल्या कन्येच्या विवाहात मुंग्यांही उपाशी राहू नये म्हणून दोन क्विंटल साखर परिसरातील मुंग्यांना टाकण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com