Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान पाठोपाठ आता 'नमो शेतकरी'चा हप्ता मिळणार

Namo Shetkari Yojana Latest Updates: अवकाळी पाऊस आणि गारपीटीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
Namo Shetkari Yojana
Namo Shetkari YojanaSaam TV
Published On

Namo Shetkari Yojana Latest Updates: अवकाळी पाऊस आणि गारपीटीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारची ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना यंदा सुरू होणार आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दर ४ महिन्यांतून एकदा २ हजार रुपये, असे वर्षात तीन हप्त्यांत ६ हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा पहिला हप्ता मे महिन्याच्या अखेरीस जमा होणार असल्याची माहिती आहे.  (Breaking Marathi News)

Namo Shetkari Yojana
Maharashtra Politics: "शरद पवारांच्या खेळीने भाजपचा ‘प्लान’ कचऱ्याच्या टोपलीत गेला"

काय आहे नमो शेतकरी योजना?

'नमो शेतकरी' योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये मिळतात. आता राज्य सरकार केंद्र सरकारच्या या ६ हजार रुपयांमध्ये आणखी ६ हजार रुपयांची भर घालणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रती वर्ष १२ हजार रुपये मिळतील. ही योजना अशी आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

नमो शेतकरी योजनेचा लाभ कसा मिळेल?

 PM किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खाते आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणे बंधनकारक आहे. राज्यातील १२ लाख शेतकरी असे आहेत, की ज्यांचे बँक खाते अजूनही आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक नाही. अशा शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते लिंक करून घ्यावे, अन्यथा त्यांना या योजनेचे पैसे मिळू शकणार नाहीत.

Namo Shetkari Yojana
PM Kisan 14th Installment: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! PM किसानच्या १४ व्या हप्त्याची तारीख ठरली

नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी या बाबी बंधनकारक

१ फेब्रुवारी २०१९ पूर्वीचा जमीनधारक शेतकरीच पात्र

सन्मान निधी मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागेल

लाभार्थीने त्याच्या नावावरील मालमत्ता नोंदीची माहिती द्यावी

बॅंक खात्याला आधार लिंक करून घेणे बंधनकारक

पीएम किसान योजनेतील लाभार्थीच ‘नमो शेतकरी (Farmers)  महासन्मान निधी’ योजनेसाठी पात्र असतील. ज्या शेतकरी लाभार्थींनी त्यांचे आधार बॅंक खात्याशी संलग्न केलेले नाही, त्यांनी तत्काळ करून घ्यावे. मेअखेरीस तथा जुलैमध्ये या योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे, अशी माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com