PM Kisan 14th Installment: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! PM किसानच्या १४ व्या हप्त्याची तारीख ठरली

PM Kisan News: PM किसान सन्मान योजनेचा १४ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
PM Kisan 14th Installment Updates
PM Kisan 14th Installment UpdatesSaam TV

PM Kisan 14th Installment Latest Updates: PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. किसान सन्मान योजनेचा १४ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ फेब्रुवारी रोजी PM किसानचा १३ वा हप्ता जारी केला होता. याचा लाभ देशभरातील जवळपास ८ कोटी शेतकऱ्यांना मिळाला होता. आता १४ वा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.  (Breaking Marathi News)

PM Kisan 14th Installment Updates
Parbhani News: रात्री मोटार चालू करण्यासाठी शेतात गेला अन् अनर्थ घडला; शेतकऱ्याच्या मृत्युने अख्खं गाव हळहळ

PM किसानचा १४ वा हप्ता कधी मिळणार?

 PM किसान सन्मान योजनेचा १४ वा हप्ता येत्या जून महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा केला जाणार आहे. मात्र या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी जोडणे अनिवार्य आहे. बँक खात्याला आधार क्रमांक जोडलेला नसल्यास, हे पैसे जमा होणार नसल्याचे राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितलं आहे.

PM किसानचा १४ वा हप्ता कुणाला मिळणार?

ज्या शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे, त्याच शेतकऱ्यांना पीएम किसानच्या १४ व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित आपापले बँक खात्याला आधार क्रमांक जोडून घ्यावा. आधार क्रमांक बॅँक खात्याशी जोडण्यासाठी आता आपापल्या गावातील टपाल कार्यालयात सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, असंही चव्हाण यांनी सांगितलं आहे.

PM Kisan 14th Installment Updates
Wedding Drama: फेरे घेण्यापूर्वी नवरदेवाने केली भलतीच मागणी; वधूकडील मंडळींनी कपडे फाटेपर्यंत धुतला

PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती लाभ मिळतो.

पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत पात्र शेतकरी (Farmers) कुटुंबास दर चार महिन्यांतून एकदा प्रत्येकी २ हजार रुपये हप्त्याप्रमाणे वर्षाला ६ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. केंद्र सरकारने साडेचार वर्षांपूर्वी ही योजना सुरु केली आहे. त्यानुसार आतापर्यंत १३ हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे.

PM किसानचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे?

- आपापल्या गावात टपाल विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) खाते उघडावे

- यासाठी आधार कार्ड आणि स्वतःचा मोबाईल क्रमांक टपाल कार्यालयात जावे

- टपाल कार्यालयातील कर्मचारी हे आपले बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी जोडतील

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com