Washim News Saam Tv
महाराष्ट्र

Hingoli : हृदयद्रावक! बायकोने रागात विहिरीत उडी मारली, वाचवायला गेलेला नवराही बुडाला, दोघांचाही मृत्यू

Washim News : वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील सवासनी गावात किरकोळ वादातून पती-पत्नीची विहिरीत उडी घेऊन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बचाव पथकाने पहाटे मृतदेह बाहेर काढले असून गावात शोककळा पसरली आहे.

Alisha Khedekar

  • नवरा-बायकोतील वादातून दुर्दैवी मृत्यू

  • पत्नीला वाचवताना पतीचाही मृत्यू

  • बचाव पथकाने मृतदेह शोधून काढले

  • सवासनी गावात शोककळा

मनोज जैस्वाल, वाशीम

वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील सवासिनी गावात एका जोडप्याच्या शुल्लक कारणावरून सुरु झालेल्या कडाक्याच्या वादानंतर पत्नीने विहरीत उडी मारली. पत्नीला बुडताना बघून तिला वाचवण्यासाठी पतीनेही विहिरीत उडी मारली. मात्र या दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत जोडप्याचं नाव अमोल कीसन जगताप आणि सीमा अमोल जगताप असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल आणि सीमामध्ये एका शुल्लक कारणावरून वाद उफाळला. या वादाला कंटाळलेल्या सीमाने रागारागात जवळच असलेल्या विहिरीत उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला. तिला वाचवण्यासाठी अमोलने क्षणाचाही विचार न करता विहिरीत उडी मारली आणि सीमाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघांचाही विहिरीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

दोघेही नवरा बायको रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबीय आणि गावकरी शोध घेत होते. रात्री सुमारे ११ वाजता विहिरीजवळ चप्पल दिसल्याने संशय निर्माण झाला आणि तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. मंगरूळपीर पोलिस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके यांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाशी संपर्क साधला.

पहाटेच बचाव पथकाच्या सदस्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. अंदाजे एका तासाच्या शोधानंतर प्रथम महिलेचा, त्यानंतर पतीचा मृतदेह सापडला. दोन्ही मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या हृदयद्रावक घटनेने सवासनी गावात शोककळा पसरली असून अमोल आणि सीमा यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Frequent IVF failure: वारंवार IVF फेल होत आहे? या कारणांमुळे १०–१५% जोडप्यांना यश मिळत नाही

Heart Care Tips: हातांच्या मुद्रांमध्ये दडलाय 'हार्ट'चा उपचार? योगा एक्सपर्ट सांगतात रोज करा या ३ सोप्या मुद्रा

Masti 4 vs 120 Bahadur : '120 बहादूर' फ्लॉप की हिट? तिकिट खिडकीवर कोणी मारली बाजी? वाचा कलेक्शन

Gold Rate Prediction: नव्या वर्षात सोनं आणखी महागणार! तोळ्यामागे ३५००० रुपयांची वाढ होणार; बँक ऑफ अमेरिकेचा दावा

Maharashtra Live News Update: अंबरनाथमधील शिंदे गटाचे पदाधिकाऱ्याने शिवसेनेला केला राम राम

SCROLL FOR NEXT