Chnadrakant Patil Saam TV
महाराष्ट्र

Karnataka CM: सीमावाद पेटला; कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना इशारा; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये असा इशाराच बोम्माईंनी दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कर्नाटक सीमावादावरुन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री आमने-सामने आले आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात (Belgaum) येऊ नये असा इशाराच बोम्माईंनी दिला आहे. त्यामुळे येत्या काळात सीमावाद पेटणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकात सीमाप्रश्नावरुन तणावाची स्थिती आहे. अशा परिस्थितीत बेळगावला येणे योग्य नाही. त्यामुळे मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, अशा आशयाचे पत्र कर्नाटकाच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्र मुख्य सचिवांना फॅक्सद्वारे पाठवल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.

महाराष्ट्रातील महाराष्ट्र्-कर्नाटक सीमाप्रश्‍न समन्वय मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई आणि सीमाप्रश्‍न उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशिल माने येत्या ६ डिसेंबरला बेळगाव दौऱ्यावर जाणार आहेत.  (Latest Marathi News)

आपल्या नियोजित दौऱ्याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा गैरसमज होत आहे की आम्ही त्यांचाशी संघर्ष करायला जात आहोत. आम्ही तिथल्या लोकांना पॅकेज जाहीर करायला चाललो आहोत, ज्याचा कर्नाटक सरकारलाही उपयोग होईल. राज्यात येऊ नका म्हणणं कायद्याला धरून नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

भाजप विरुद्ध भाजप असा हा संघर्ष नाही. मुख्यमंत्री राज्याचे असतात, राज्याच्या भावना लक्षात घेऊन बोलावं लागतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलतील. दोन्ही राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून निर्णय होईल. कारण कोर्टातल्या मुद्द्यावर अशी भांडाभांड करून काही उपयोग नाही, असं चंद्रकातं पाटलांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

SCROLL FOR NEXT