Manikrao kokate Saam tv
महाराष्ट्र

Manikrao kokate : 'आमदार अमोल मिटकरी' माझे 'गुरु'...त्यांच्यामुळे जिंकलो; मंत्री माणिकराव कोकाटे यांचं विधान चर्चेत

Manikrao kokate on amol mitkari : आमदार अमोल मिटकरी' माझे 'गुरु' असून त्यांच्या सभेमुळे काठावर निवडून आल्याचं कोकाटे म्हणाले. कोकाटे यांच्या विधानाची जोरदार चर्चा होत आहे.

Vishal Gangurde

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री माणिकराव कोकाटे आणि आमदार अमोल मिटकरी एकत्र व्यासपीठावर

कोकाटे यांनी अमोल मिटकरींना आपला 'गुरु' म्हणत त्यांच्यामुळेच निवडणुकीत यश मिळाल्याचं सांगितलं.

कोकाटेंकडून कार्यकर्त्यांना अजित पवारांच्या नेतृत्त्वाखालील उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन

अकोला : अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील दोन नावं... माणिकराव कोकाटे आणि अमोल मिटकरी.... एक पक्षाचा मंत्री...तर दुसरा पक्षाचा आमदार... मात्र, दोघांनाही जोडणारा एक सामायिक धागा म्हणजे त्यांची वादग्रस्त वक्तव्य... आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे हे दोन्हीही नेते एकत्र एकाच व्यासपीठावर आले होते. निमित्त होतं अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात आयोजित पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याचं.

अकोला शहरातील झुनझूनवाला सभागृहात अकोला जिल्ह्याचा पक्ष कार्यकर्ता आणि पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय. या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी आमदार अमोल मिटकरींची तोंडभरून स्तुती केलीय.

एव्हढेच नव्हे तर अमोल मिटकरी आपले 'गुरु' असल्याचं माणिकराव कोकाटे म्हणालेय. विधानसभा निवडणुकीत अमोल मिटकरी यांनी आपल्या मतदारसंघातून सभा घेतल्यानेच आपण 3 हजार मताने का होईना, मात्र काठावर निवडून आल्याचं कोकाटे म्हटलं.

दोघांचंही दुखणं सांगताना माणिकराव कोकाटे म्हणालेत की, बोलणाऱ्यांनाच लोक नाव ठेवतात. मात्र, आपण आता आणि भविष्यातही अमोल मिटकरी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचं माणिकराव कोकाटे म्हणाले.

दरम्यान, माणिकराव कोकाटे गेली पाच टर्म नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मतदारसंघातून वेगवेगळ्या पक्षांतून विधानसभेवर निवडून येत आहेत.‌ तर अमोल मिटकरी पहिल्यांदाच विधान परिषदेचे आमदार बनले. त्यातच कोकाटे यांनी मिटकरींना गुरु म्हटल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

याच कार्यक्रमात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना जास्तीत जास्त संख्येनं निवडून द्या. अजित पवारांचे हात बळकट करा, असं आवाहनही यावेळी माणिकराव कोकाटे यांनी केलंय.

दरम्यान, शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलतांना त्यांनी सरकार सर्वच आमदारांना समान निधी देत असल्याचे म्हटलंय. शहरानुसार निधीचे हेड बदलत असल्याने निधी कमी-जास्त होत असल्याचं ते म्हटलेय. तर कुंभमेळ्यासाठी गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जी समिती बनली आहे, त्यात इतर पक्षांच्या मंत्र्यांना दुय्यम स्थान मिळाले आहे का? यावर त्यांनी बोलतांना म्हटले की मुख्यमंत्र्यांना ते अधिकार आहे आणि त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचा कोकाटे म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: औषधे आजपासून होणार स्वस्त

Shocking: आधी मैत्रिणीशी समलिंगी विवाह, नंतर नाशिकच्या तरुणाशीही लपून लग्न; शरीरसंबंधाचा व्हिडिओ पाहताच...

School Holiday: यंदा दिवाळीच्या सुट्ट्या फक्त १२ दिवस, शाळेच्या सुट्यांची यादी जाहीर

Matheran Horses: माथेरानमधील घोड्यांना विचित्र आजाराची लागण|VIDEO

Thane Metro : ठाणेकरांचे मेट्रोचं स्वप्न साकार, आजपासून ट्रायल रन सुरू | VIDEO

SCROLL FOR NEXT