Bhadrapad Pola : बैलाची पूजा नव्हे, शेतकऱ्यांच्या कष्टाचा गौरव; पुण्यात भाद्रपद पोळा उत्साहात साजरा, VIDEO

Bhadrapad Pola video : पश्चिम महाराष्ट्रात भाद्रपद पोळा सोहळा साजरा केला जातो. तर मावळ भागातही मोठ्या उत्साहात सण साजरा केला जातो.
Bhadrapad Pola
Bhadrapad Pola videoSaam tv
Published On
Summary

भाद्रपद पोळा सण हा शेतकऱ्यांच्या कष्टांचा सन्मान

पुणे जिल्ह्यातील मावळ भागात हा सण उत्साहात साजरा

महिलांकडून बनवली जाते पारंपरिक पुरणपोळी

बैल हे शेतकऱ्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक

पुणे : शेतकरी आणि त्याच्या बैलाचं नातं कामापुरते नसून अतूट भावनिक नातं असतं. वर्षभर खांद्याला खांदा लावून शेतात राबणाऱ्या या मुक्या मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण आहे. भाद्रपद पोळा सण हा पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शेतकऱ्यांसाठी पोळा हा बैलाची पूजा सण नसून शेतकऱ्यांच्या आयुष्याचा आणि कष्टाचा गौरव आहे.

भारताची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे. बळीराजा म्हणून ओळखला जाणारा शेतकरी बांधव हा सर्वांसाठी अन्न पिकवतो. बैल हा शेतकऱ्यांचा प्रवासात खरा सोबती असतो. बैल, आधुनिक तंत्रज्ञान कितीही पुढे गेले. तरी आजही बहुतांश शेतकऱ्यांसाठी बैल हाच त्याचा आधार आहे.

नांगरणी, पेरणी, आणि मालवाहतुकीपर्यंतचे बैलाचं काम अफाट आहे. बैल फक्त एक प्राणी नसून शेतकऱ्याच्या कुटुंबाचा अविभाज्य घटक आहे. बैलाविना पेरणी-कापणी नाही, हे शेतकऱ्यांचे शब्द त्यांच्या मनातील भावना स्पष्ट करतात. बैलपोळा सण हा निष्ठा आणि त्यागाचा सन्मान आहे.

Bhadrapad Pola
Fakhar Zaman Catch Controversy : एकीकडे अश्रूंच्या धारा, दुसरीकडे वादाचे सूर; भारत-पाकिस्तानच्या दुसऱ्या सामन्यात नवा ड्रामा

विदर्भात श्रावणी बैलपोळा साजरा करण्यात येतो. तर पश्चिम महाराष्ट्रात भाद्रपद पोळा साजरा केला जातो. हाच भाद्रपद पोळा पुणे जिल्ह्यातील मावळच्या विविध भागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. महिला मंडळींची सकाळी लवकर उठून पुरणपोळी करण्यासाठी लगबग सुरू असते.

Bhadrapad Pola
Boyfriend Girlfriend : दोघात तिसरा...! तरुणाच्या आयुष्यात दुसरी तरुणी आली, प्रेमात अडथळा ठरलेल्या गर्लफ्रेंडला संपवलं

पुरुष मंडळी बैलांची आंघोळ करणे, बैलाला विविध साज घालून सजवणे. बैलावर भंडारा उधळणे, त्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. बळीराजा आपल्या घरी वाजत गाजत आणले जाते. त्याची विधिवत पूजा केली जाते. तर बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com